चाकण, तळेगावमध्ये आता लॉजिस्टिक पार्क

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पिंपरी - उद्योगांकडून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या सोयीसाठी राज्य सरकारने औद्योगिक वसाहतींमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे धोरण ठरवले आहे. चाकण, तळेगाव या औद्योगिक पट्ट्यात हे पार्क लवकरच उभे राहणार आहे. त्यामुळे परिसरातील उद्योगांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. 

लॉजिस्टिक पार्क उभे करणाऱ्यांना अतिरिक्‍त दोन चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्यात येणार आहे. त्याला उंचीच्या बंधनातून सूट देण्यात येणार आहे. खासगी विकसकांना ही लॉजिस्टिक पार्क उभी करता येणार आहेत. 

लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय ? 
औद्योगिक वसाहती असतात, त्याठिकाणी लॉजिस्टिक पार्कची आवश्‍यकता असते. कारखान्यामध्ये तयार होणारे उत्पादन लॉजिस्टिक पार्कमधील गोदामामध्ये ठेवण्यात येते. कार्गोची सुविधा, उत्पादनाचे ग्रेडिंग, वितरण, साठवणूक, फ्रेट स्टेशन आदी सुविधा उपलब्ध असतात. 

राज्य सरकारने तयार केलेल्या धोरणामध्ये या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. लॉजिस्टिक पार्कला करण्यात येणारा विजेचा पुरवठा हा उद्योगांच्या दराने करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक पार्कसाठी आवश्‍यक असणाऱ्या परवान्यांसाठी एक खिडकी योजना ठेवण्यात आली असल्याचे उद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

लॉजिस्टिक पार्क ही उद्योगांसाठी काळाची गरज बनली आहे. पार्क राज्यातील गुंतवणूक वाढण्यास चालना मिळणार असून, रोजगाराच्या संधीत चांगली वाढ होणार आहे. पुरंदर परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. पुणे परिसरात जगभरातील नामांकित कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प सुरू केले आहेत.उत्पादन निर्यात करण्यासाठी लॉजिस्टिक पार्क औद्योगिक वसाहतीमध्ये उभी करणे सहजशक्‍य आहे. 
- अनंत सरदेशमुख, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर

Web Title: Chakan Talegaon Logistic park