चाकणची कोंडी सुटणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

राजगुरुनगर - ‘अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर पुणे-नाशिक रेल्वे, खेड-सिन्नर चौपदरीकरण, अशी मोठी कामे होत आहेत. त्याचप्रमाणे राजगुरुनगर-नाशिक फाटा सहापदरीकरणाचा पुन्हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होत आहे. या कामात चाकणला मोठा उड्डाण पूल आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी राहणार नाही,’’ असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

राजगुरुनगर - ‘अनेक दिवसांच्या पाठपुराव्यानंतर पुणे-नाशिक रेल्वे, खेड-सिन्नर चौपदरीकरण, अशी मोठी कामे होत आहेत. त्याचप्रमाणे राजगुरुनगर-नाशिक फाटा सहापदरीकरणाचा पुन्हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होत आहे. या कामात चाकणला मोठा उड्डाण पूल आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी राहणार नाही,’’ असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

खेड तालुक्‍यातील खरपुडी बुद्रुक आणि खरपुडी खुर्द येथील विविध विकासकामांचा उद्‌घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम रविवारी झाला. त्या वेळी आढळराव पाटील बोलत होते. या वेळी आमदार सुरेश गोरे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पंचायत समिती सदस्या ज्योती अरगडे, विजया शिंदे, प्रकाश वाडेकर, सरपंच मंगल दाभाडे, उपसरपंच स्वाती बरबटे, मीनाक्षी खंडागळे, सोपान गाडे, दशरथ गाडे, जयसिंग भोगाडे, आबा चौधरी, सत्यभामा काशीद, बबन भोगाडे, राजेंद्र बरबटे, अलका निकाळजे, आशा भोगाडे, प्रशांत गाडे आदी उपस्थित होते. 

आढळराव पाटील म्हणाले, ‘‘खेड-सिन्नर महामार्गाचे १८८० कोटींचे काम झाले. पुणे-नाशिक रेल्वे हा ७५०० कोटींचा प्रकल्प मंजूर होऊन १०० कोटी टोकण रक्कम खात्यावर पडली आहे. जुन्नर-घोडेगाव- भीमाशंकर- राजगुरुनगर हा १००० कोटींचा महामार्ग होत आहे. राजगुरुनगर- नाशिक फाटा सहापदरीकरण मंजूर असून, खेडच्या हद्दीतील जमिनी संपादित झाल्या आहेत. अशी मोठी कामे होताना अनेक दिवसांचा पाठपुरावा आणि दीर्घकाळचे नियोजन लागते. अनेक तांत्रिक अडचणी येतात. बैलगाडा शर्यतींबाबतही दीर्घकाळ संघर्ष सुरू आहे.’’ 

‘‘या वर्षीचा दुष्काळ गंभीर असून, चारा पाण्याअभावी जनावरे विकायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू. संपूर्ण तालुका दुष्काळी घोषित करण्याची मागणी लावून धरली आहे,’’ असे या वेळी आमदार गोरे म्हणाले. 

‘‘खरपुडी परिसरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती माध्यमातून खूप कामे झाली आहेत. दशक्रिया घाटाच्या कामाला टप्प्याटप्प्याने निधी देत राहू,’’ असे बाबाजी काळे यांनी सांगितले. सुदाम कराळे यांनी सूत्रसंचालन केले. बापूसाहेब चौधरी यांनी आभार मानले. 

Web Title: Chakan Traffic Flyover Shivajirao Adhalrao Patil