चाळकवाडीचा टोलनाका आमदार शरद सोनवणेच्या नेतृत्वाखाली झाला बंद

Chalakwadi Tolnaka is closed under the leadership of MLA Sharad Sonawane.
Chalakwadi Tolnaka is closed under the leadership of MLA Sharad Sonawane.

जुन्नर - नाशिक-पुणे मार्गावरील आळेफाट्याजवळ चाळकवाडी ता. जुन्नर येथील टोल वसुली जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वा खाली कार्यकर्त्यांनी शांततामय वातावरणात शुक्रवारी (ता.13) दुपारी 1 च्या दरम्यान बंद करण्यात आली आहे. 

आमदार सोनवणे म्हणाले, विरोधकांनी टोलबंदीची हाक दिली खरी परंतु हा त्यांचा हल्लाबोल टोलच्या झोलसाठी आणि समोर उभ्या ठाकलेल्या निवडणुकांना पाहुण होता. टोलनाका सुरु करण्यापासुन माझा विरोध कायम राहिलेला आहे. त्याचे कारण आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, खेड, येथील बाह्यवळणाची कामे प्रलंबित आहेत. पुलांची कामे अर्धवट आहेत. भटकळवाडी, चाळकवाडी येथील शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे कोर्टात अडकलेले आहे. अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील सलग तीन वर्षे स्थानिक आमदार या नात्याने मी वारंवार बैठक लावून सुचना व तक्रारी दिलेल्या आहेत.

रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी, पालक मंत्री गिरीश बापट यांनी 15 मे अखेर रस्त्याच्या कामाला सुरवात होईल, असे आश्वासन दिले होते आणि काम जर सुरु झाले नाही तर आपण टोल नाका बंद करा असे त्यांनी मला सांगितले होते. पालक मंत्री गिरीश बापट यांच्या विनंतीचा मान ठेवुन अधिक एक महिना वाट पाहिली. परंतु प्रलंबित कामे व शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करणे बाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे सदर टोलनाका मी बंद केला आहे. मी टोल नाका बंद करणार आहे बातमी विरोधकांना समजली आणि त्यांनी घाणेरडे राजकारण करून श्रेयवादाची खोटी लढाई चालु केली.  गेले काही दिवस चाळकवाडीचा टोल नाका वसुली येत्या 15 जुलै ला आम्ही बंद करणार असे जाहीर केले होते. यावेळी टोल नाका बंद करण्यासंदर्भात आमदारांनी तहसीलदार किरण काकडे यांना निवेदन दिले.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना पोलिस निरीक्षक गणेश उगले, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड, सरपंच सोमनाथ माळी, अशोक खांडेभराड, प्रदीप देवकर, सचिन वाळुंज, सतिष कसबे व जुन्नर, आंबेगाव, खेड, चाकण येथील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com