शिवसेनेसमोर एकजुटीचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

पुणे - ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारी देण्यावरून शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद निवडणुकीत उमटू न देणे आणि एकजूट करून निवडणुकीला सामोरे जाण्याची आव्हान शहर शिवसेनेपुढे उभे राहिले आहे. हे आव्हान पक्षश्रेष्ठी कसे पेलणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

युती होऊ नये, अशी भावना भाजपबरोबरच शिवसैनिकांमध्येही होती. स्वबळाचा निर्णय झाल्यानंतर शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला. "कमळाबाईला जागा दाखवून देऊ', अशी गर्जनाही शिवसेनेकडून करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र उमेदवारी वाटप करताना पक्षाकडून जो घोळ घालण्यात आला आणि निष्ठावंतांना डावलून ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्यांना उमेदवारी देण्यात आली. पोलादी संघटना म्हणून आळखलेल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या सैनिकांनीच रस्त्यावर उतरून राडा घालत पक्षश्रेष्ठींवर जाहीर नाराजी व्यक्त झाली.

उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटचे काही मिनिटे राहिली असताना देखील पक्षाकडून एबी फार्मचे वाटप करण्यात येत होते. या गोंधळामुळे पक्षाला 162 जागांवरही उमेदवार उभे करता आले नाहीत. गटबाजीच्या मारामारीत अनेक निष्ठावंतांना उमेदवारी मिळू शकली नाही. परिणामी, आज छाननीच्या दिवशीही अनेक उमेदवारांना त्यांचा त्रास सहन करावा लागला. अर्जातील चुकांमुळे काही ठिकाणी उमेदवारी अर्ज बाद होण्याची नामुष्की पक्षाच्या उमेदवारांवर आली. एकीकडे फसलेले नियोजन आणि दुसरीकडे भडकलेला शिवसैनिक अशा परिस्थितीत सैनिकांना शांत करून एकत्रित करण्याचे कसब पक्षाच्या नेत्यांना दाखवावे लागणार आहे. त्यावरच महापालिकेच्या सभागृहातील भगव्याचे अस्तित्वात ठरणार आहे.

Web Title: Challege of unity for Shivsena