मानवी तस्करीला आळा घालण्याचे आव्हान : डॉ. मुळे 

Challenge of preventing human trafficking says Dr Mule
Challenge of preventing human trafficking says Dr Mule

पुणे : परराष्ट्र मंत्रालय परदेशातील भारतीय कामगारांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करत आहे. त्या माध्यमातून मंत्रालयाने अनेक बेकायदा एजंटांना "ब्लॅकलिस्ट' केले आहे. त्यामुळे अधिकृत एजंटांकडून भारतीय कामगारांना चांगली वागणूक मिळू लागली आहे. सध्या मानवी तस्करीला आळा घालणे हे परराष्ट्र खात्यापुढील मोठे आव्हान आहे, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे पासपोर्ट आणि व्हिसा विभागाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी सांगितले. 

विमाननगर येथे परराष्ट्र मंत्रालयाच्या विदेशी रोजगार विभागाकडून आयोजित द्वितीय वार्षिक उतरप्रवासी संरक्षण संमेलनाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 

या वेळी डॉ. देयेश्वर मुलायम, संयुक्त सचिव अमृत लुपून यांच्यासह परराष्ट्र मंत्रालय सहसचिव अमित कुमार, संयुक्त सचिव आणि सरचिटणीस (स्थलांतरित) एम.सी. ल्यूथर, संयुक्त सचिव मनीष गुप्ता आदी अधिकारी उपस्थित होते. 

मुळे म्हणाले, ""भारत जगातील बाजारपेठेला मनुष्यबळ पुरवणारा सर्वांत मोठा देश आहे. भारताला या कामगारांच्या माध्यमातून 70 दशलक्ष डॉलर्स परकी चलन मिळते, असा जागतिक बॅंकेचा अहवाल आहे; परंतु कायद्याच्या अज्ञानाअभावी परदेशातील स्थलांतरित कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. स्थलांतरित भारतीयांना पुन्हा मायदेशी परतण्यासाठी मंत्रालयाकडून सोपी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय बेरोजगारांना परदेशात अमाप रोजगार संधी उपलब्ध आहेत. त्या संधी मिळवून देण्यासाठी नव्या कल्पना आणि प्रवाहांचा (ट्रेंड) अभ्यास करून जगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.'' 

द्वितीय वार्षिक प्रवासी संरक्षण संमेलनाचा आराखडा 

- सुरक्षित आणि कायदेशीर स्थलांतरितांना प्रोत्साहन देणे 
- स्थलांतरितांना मोफत "प्री डिपार्चर' प्रदान करणे 
- बेरोजगारांना समुद्र आणि हवाईमार्गे पारपत्राची प्रक्रिया प्रशिक्षण 
- भारतात सुरक्षित व कायदेशीर स्थलांतरासाठी मोहीम राबविणे 
- कामगार आणि परिचारिकांच्या "फील्ड फॉर्म'साठी विशेष कक्ष 
- विदेशातील रोजगारवाढीसाठी मंत्रालयस्तरावरून प्रयत्न करणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com