
पुण्यातील वडगाव मावळ भागातील शिवराज गार्डन या हॉटेलमध्ये ग्राहक वाढविण्यासाठी ही हटके ऑफर सुरु केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हॉटेल व्यवसायिकांना मोठा फटका बसला होता.
पुणे : तुम्ही खवय्ये आहात का? तुम्हाला नॉनव्हेज खायला आवडते का? तुम्हाला रॉयल एनफिल्डची बुलेट हवीये का? मग तुमच्यासाठी एक भन्नाट संधी आहे. तुम्हाला फक्त बुलेट थाली संपावायची आहे आणि रॉयल एनफिल्ड घरी घेऊन जायची आहे. अट फक्त एवढीच की ही नॉनव्हेज बुलेट थाली अवघ्या एका तासात संपावायची आहे. तुम्हाला काय वाटत, तुम्ही हे सहज करु शकता? त्या आधी एकदा ही बातमी पुर्ण वाचा....
पुण्यातील वडगाव मावळ भागातील शिवराज गार्डन या हॉटेलमध्ये ग्राहक वाढविण्यासाठी ही हटके ऑफर सुरु केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हॉटेल व्यवसायिकांना मोठा फटका बसला होता. कित्येक हॉटेल व्यावसायिक यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. असाच प्रयत्न हॉटेल शिवराज गार्डन यांनी ग्राहकांसाठी हटके ऑफर सुरु केली आहे. ''60 मिनिटांमध्ये बुलेट थाली संपवा आणि बुलेट घरी घेऊन जा'' अशी ही ऑफर आहे. ऐकायला जरी ही ऑफर भन्नाट वाटत असली तरी एवढी सोप्पी नाही बरं का?
काय आहे हे बुलेट थाली कॉन्टेस्ट?
तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड बुलेट चॅलेंज जिंकायचे असेल तर तुम्हाला फक्त 60 मिनिटांमध्ये नॉन व्हेज थाली पुर्ण संपवायची आहे. जो हे चॅलेंज पुर्ण करेन थाली संपवले त्या विजेत्यास बाइक 1.65 लाख रुपये किंमतीचा बाईक मिळणार आहे.
वडगाव मावळ स्थित हॉटेल शिवराजचे मालक अतुल वाईकर यांनी या कॉन्टेस्टबाबत माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की, ग्राहकांना त्यांच्या हॉटेलकडे वळविण्यासाठी त्यांना ही कॉन्टेस्ट सुरु करण्याची कल्पना सुचली.
'बुलेट थाली कॉन्टेस्टचे तयारी कशी झाली?
अतुल वाईकर यांनी 5 नव्या रॉयल एनफिल्डच्या बुलेट हॉटेलच्या वरांड्यात लावल्या. त्यानंतर बॅनर आणि 'बुलेट थाली कॉन्टेस्ट' बाबत संपुर्ण माहिती देणारे मेनुकार्ड तयार केले.
या बुलेट थालीमध्ये नॉनव्हेज खाद्यपदार्थ आहे. यामध्ये 4 किलो चिकनच्याआणि फ्राईड फिशच्या12 प्रकारच्या वेगवेगळ्या डिशेस् समावेश आहे. फ्राईड सुरमई, पॉम्फेट फ्राईड फिश, चिकन तंदुरी, ड्राय मटन, ग्रेव्ही मटन, चिकन मसाला आणि कोळंबी बिर्याणी अशा डिशेस् बनविण्यासाठी 55 जण काम करतात.
'बुलेट थाली कॉन्टेस्टला प्रतिसाद कसा होता?
'बुलेट थाली कॉन्टेस्टला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कित्येक लोक या कॉन्टेस्टमुळे हॉटेलमध्ये येत आहेत आणि 'बुलेट थाली कॉन्टेस्ट थाली ट्राय करत आहे. अशी माहिती अतुल वाईकर यांनी दिली. सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हॉटेल शिवराजमध्ये रोज जवळपास 65 थालींची विक्री होते. स्पेशल रावण थाली, बुलेट थाली, मालवणी फिश थाली, पेहलवान मटन थाली, बकासुर चिकन थाली, सरकार मटन थाली, अशा 6 प्रकारच्या थाली सर्व करतात.
'बुलेट थाली कॉन्टेस्टलाची किमंत?
बुलेट थाली कॉन्टेस्टची प्रत्येकी 2500 रुपये इतकी किंमत आहे.
आठ वर्षापुर्वी हॉटेल शिवराज सुरवात झाली असूनही नेहमी वेगवेळ्या ऑफर ग्राहकांसाठी घेऊन येत असतात. अतुल वाईकर यांनी यापुर्वी 8 किलोची रावन थाली 60 मिनिटात संपविण्याचे कॉन्टेस्ट घेतली होती. विजेत्यासाठी ही थाली फुकट होती आणि 500 रुपये रोख बक्षीस देण्यात आले होते.