पुणे - दापोडीतील चेंबर दुरूस्ती बाबत आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

रमेश मोरे
मंगळवार, 17 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : दापोडी येथील  तेजसिंग पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ख्रिश्चन स्मशानभूमि व कडबाकुट्टीजवळ ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने परिसरात कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

जुनी सांगवी (पुणे) : दापोडी येथील  तेजसिंग पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ख्रिश्चन स्मशानभूमि व कडबाकुट्टीजवळ ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने परिसरात कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत सहाय्यक आरोग्य आधिकारी मनोज लोणकर यांना निवेदन येथील मानव अधिकार संस्थेच्या वतीने येथील दुरूस्ती करण्या बाबत निवेदन  देण्यात आले आहे. दापोडी रेल्वे स्टेशनच्या जागेमध्ये चेंबर तुबल्याने स्वच्छता कोणी करायची रेल्वेने की, महापालिकेच्या आरोग्य विभागाने यामुळे येथील प्रश्न गेली अनेक दिवसांपासुन बिकट होत चालला आहे. रेल्वे प्रशासन म्हणतेय आम्ही कचरा करत नाही. तर  आरोग्य विभागाकडे तक्रार केल्यास आमची हद्द नाही असे नागरीकांना सांगितले जाते.

ड्रेनेजालाईनला योग्य उतार नसल्याने मैलामिश्रित पाणी तुंबते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. रेल्वेपटरी लगत खुली जागा असल्याने अज्ञात व्यक्ती कचरा आणून टाकतात. चार-चार दिवस येथील कचरा उचलला जात नाही. याबाबत मानव अधिकार संघाचे नरेश आनंद म्हणाले, पालिका आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन ही समस्या दुर केली पाहिजे. मात्र आरोग्य विभाग जबाबदारी टाळते आहे. आरोग्य विभागाने जबाबदारी घेवुन येथील प्रश्न सोडवावा.अशी मागणी आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: chamber repairing letter to health officers