चेंबरच्या 'लाडू चिवडा' उपक्रमाने समाजाला वळण : श्रीनिवास पाटील

चेंबरच्या 'लाडू चिवडा' उपक्रमाने समाजाला वळण  : श्रीनिवास पाटील

पुणे : '''दि पुना मर्चंटस' चेंबरचा लाडू चिवडा या उपक्रमाने समाजाला वळण लावण्याचे काम केले. '', असे गौरवोद्गार सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी येथे व्यक्त केले. समाजाने गरीबाला मदतीचा हात दिला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. 

'दि पुना मर्चंटस चेंबर'च्या रास्त भावात लाडु चिवडा उपक्रमाचे सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, माजी आमदार मोहन जोशी, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सचिव अशोक लोढा, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया, विजय मुथा आदी उपस्थित होते. 
- ना नफा ना तोटा तत्त्वावर या उपक्रमाचे 30 वर्षापासून आयोजन 
-  लाडु - चिवडा यांचा अनुक्रमे प्रति किलो 105 आणि 110 रुपये इतका  दर
- नेहरू रस्त्यावर अप्सरा चित्रपट गृहाजवळ उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाबाबत व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करुन निर्णय घेण्याचे महापौर टिळक यांचे आश्वासन 

याठिकाणी मिळतील लाडु - चिवडा 
ओसवाल बंधु समाज कार्यालय(शंकरशेठ रस्ता),
दि पुना मर्चंटस चेंबर (मार्केट यार्ड)
जयश्री आॅईल अॅण्ड शुगर डेपो (कोथरूड)
जगदीश ट्रेडिंग कंपनी (हडपसर)
आगरवाल प्राॅडक्ट (कर्वेनगर)
नरेंद्र इलेक्ट्रिकल (टिळक रस्ता)
भगत ट्रेडर्स (सिंहगड रस्ता)
आझाद मित्र मंडळ (पुष्प मंगल कार्यालयाजवळ)
योगीराज रद्दी डेपो (अरण्येश्वर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com