मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

पुणे - मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी (ता. 5) पावसाची शक्‍यता हवामान खात्यातर्फे गुरुवारी वर्तविण्यात आली. तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहणार आहे. शनिवारी व रविवारी राज्यात हवामान कोरडे राहणार असून, सोमवारी (ता. 8) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

मालदीव, लक्षद्वीपचा पूर्वेकडील भाग ते मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग, केरळचा उत्तर भाग, कर्नाटकाचा अंतर्गत भाग, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागांत ढगाळ हवामान असून, वातावरणात दमटपणा तयार होत आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. 

आगामी चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील विटा येथे पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच कऱ्हाड, कवठेमहाकाळ, शाहूवाडी, तासगाव येथे प्रत्येकी एक सेंटिमीटर पाऊस पडला. विदर्भातील मौदा, सावनेर, वर्धा येथे दोन सेंटिमीटर, भिवपूर, हिंगा येथे प्रत्येकी एक सेंटिमीटर पाऊस पडला. 

पुण्यात उन्हाचा चटका 
शहरात कमाल तापमानाच्या पाऱ्याने पुन्हा चाळीशी गाठली आहे. शिवाजीनगर येथे 39.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर लोहगाव येथील कमाल तापमानाच्या पाऱ्याने 40.9 अंश सेल्सिअसपर्यंत उसळी मारली होती.

Web Title: Chance of rain today in central Maharashtra