Coronavirus : 'जेईई मेन'चे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा

Chance to select JEE Main Examination Center
Chance to select JEE Main Examination Center

पुणे : 'कोरोना'मुळे 'जेईई मेन'ही प्रवेश परीक्षा लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईचे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा 'नॅशनल टेस्टींग एजन्सी'ने (एनटीए) दिली अाहे. यासाठी १४ एप्रिल पर्यंत मुदत आहे. 

'जेईई मेन'च्या नियोजन वेळापत्रकानुसार एप्रिलच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात ही परीक्षा पार पडणार होती. मात्र, 'कोरोना' लाॅकडाऊन मुळे ही परीक्षा आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

सचिवांकडून २३ जणांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी; गृहमंत्र्यांकडून कारवाई

'कोरोना'मुळे विद्यार्थी सध्या आपापल्या घरी आहेत. अनेक विद्यार्थी कोटा, हैद्राबाद, दिल्ली, पुणे, मुंबई यासह इतर शहरांमध्ये क्लाससाठी गेलेले होते. परीक्षेच्या आधी शेवटच्या आठवड्यापर्यंत हे क्लास सुरू असतात. त्यामुळे विद्यार्थी क्लासच्या जवळचे सेंटर निवडतात. लाॅकडाऊनमुळे विद्यार्थ्यांनी पुर्वी निवडलेले सेंटर त्यांना आता अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन 'एनटीए'ने यात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या सोईचे सेंटर निवडण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत संधी दिली आहे. 

भारतात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात; इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा इशारा

'एनटीए'च्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी त्यांच्या सोईचा शहर सेंटर म्हणून निवडू शकणार आहेत. देशात व परदेशात २०० पेक्षा जास्त शहरांमध्ये 'जेईई मेन'ची परीक्षा होते. त्यात महाराष्ट्रात २३ शहरांमध्ये सेंटर आहेत. महाराष्ट्रातून  पुणे, हैद्राबाद आणि कोटा येथे विद्यार्थी क्लास साठी जातात, त्यांना याचा फायदा होईल असे तज्ज्ञांचे म्हणने आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com