पुण्यात मुसळधार पावसाचा पोलिसांनाही फटका; चंदननगर पोलिस स्टेशन रात्रभर पाण्यात

सुषमा पाटील
Thursday, 15 October 2020

बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका शहरासह उपनगर भागाला ही बसला पोलिस स्टेशनसह बैठे घरे सोसायटया, रस्ते पावसानं झोडपून काढले. चंदननगर पोलिस ठाण्यात पावसाचे पाणी शिरल्याने टेबला खाली ठेवलेल्या फाईली भिजल्या काही संगणक भिजले.

रामवाडी(पुणे) : कर्तव्य बजवताना नैसर्गिक आपत्ती समोर हतबल न होता आपली जबाबदारी चोखपणे बजावणारे पुणे पोलिसांचा काल प्रत्यय आला. पुणे शहरात काल (ता. 14 बुधवारी) पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये अनुभवास आला. कमरे इतक्या पावसाचे पाणी पोलिस स्टेशनमध्ये शिरल्याने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रभर टेबला बसून कर्तव्य पार पाडत होते. 

बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका शहरासह उपनगर भागाला ही बसला पोलिस स्टेशनसह बैठे घरे सोसायटया, रस्ते पावसानं झोडपून काढले. चंदननगर पोलिस ठाण्यात पावसाचे पाणी शिरल्याने टेबला खाली ठेवलेल्या फाईली भिजल्या काही संगणक भिजले.

प्रत्येक विभागात पाणी शिरल्याने संगणक उचलताना करंट बसत होते अशा वेळी जीवाची पर्वा न करता जेवढे होईल. त्या वस्तु वाचवण्याचा धडपड सुरु होती. पाण्याला जाण्यासाठी वाट करून दिल्यावर सकाळपर्यत पाणी ओसरले. सकाळपासुन पोलिस स्टेशनमध्ये चिखल गाळ काढण्याच्या काम सुरु होते. 

 

''पोलिस कर्मचारी व अधिकारी यांनी रात्रभर टेबला बसुन आपलं कर्तव्य बजावत राहिले.'' असे चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandannagar police station in water overnight due to heavy RainFall