esakal | पुण्यात चंदननगरमध्ये व्हेंटिलेटर बेडअभावी आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात चंदननगरमध्ये व्हेंटिलेटर बेडअभावी आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

पुण्यात चंदननगरमध्ये व्हेंटिलेटर बेडअभावी आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू

sakal_logo
By
विनायक होगाडे

रामवाडी : व्हेंटिलेटर बेड अभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार काल (ता.13 ) चंदननगर येथे घडला. प्रविण परमार (वय 59 ) रा. सोपाननगर वडगावशेरी, यांना गेल्या आठवड्यात ताप आल्याने जवळच्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. ताप कमी होत नसल्याने खराडी येथील कोविड सेंटर येथे स्वॅब टेस्टिंग केली होती पण काही कारणास्तव यंत्रात बिघाड झाल्याने रिपोर्ट न आल्याने पुन्हा दुसर्‍या दिवशी त्यांची स्वॅब टेस्टिंग घेण्यात आली. त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.घरातील व्यक्तींची तपासणी केली असता त्यांची पत्नी व एक मुलगी कोरोना पॉझिटिव्ह झाले तर एक मुलगी निगेटिव्ह रिपोर्ट आला. पत्नी व मुलगी यांच्यात सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशन मध्ये आहेत.

सरकारी दवाखान्यात बेड न भेटल्याने गुरुवारी रात्री चंदननगर येथील खाजगी दवाखान्यात परमार यांना अ‍ॅडमिट करण्यात आले होते. सोमवारी त्यांची तब्येत ठीक असल्याचे डॉक्टरां कडून सांगण्यात आले. त्याच दिवशी संध्याकाळी पासुन प्रविण परमार फोन लागत नसल्याने मंगळवारी सकाळी पत्नी भेटण्यासाठी गेल्या पण भेट झाली नाही. त्याच दिवशी सकाळी ऑक्सिजन पातळी त्यांची कमी झाली आहे असे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्याने तीन तास व्हेंटिलेटर बेड साठी सरकारी तसेच खाजगी दवाखान्यात चौकशी केली असता बेड कुठे ही उपलब्ध न झाल्याने परमार यांचा कोरोना मृत्यु झाला. दुर्दैव तीन तास व्हेंटिलेटर बेड साठी धावाधाव केली पण बेड मिळाला नाही. घरातील मुख्य व्यक्तीं गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे असे पंकज सुरती यांनी सांगितले.