चंदगड अर्बन निधी बॅंकेचे कार्यालय फोडले

Crime-Scene
Crime-Scene

पुणे - चंदगड अर्बन निधी बॅंक कंपनीच्या के. के. मार्केट संकुलातील कार्यालयाची तोडफोड संतप्त गुंतवणूकदारांनी मंगळवारी केली. बॅंकेच्या संचालकाने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्यामुळे ही तोडफोड झाली. संचालकाने यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील गुंतवणूकदारांची एक ते दीड कोटीची फसवणूक केल्याची माहिती समोर आली.

धनकवडी-बालाजीनगर येथील के. के. मार्केटमध्ये चंदगड अर्बन निधी बॅंकेचे कार्यालय आहे. तेथे बॅंक नसतानाही बॅंकेचा फलक लावला होता. कोल्हापूर येथे नवीन शाखेचे उद्‌घाटन असल्याचे सांगत ३० डिसेंबरपासून २ जानेवारीपर्यंत बॅंक बंद राहील, असा फलक तेथे लावला होता. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी कार्यालयात जाऊन तोडफोड केली. 

संचालकाने गुंतवणूकदारांना लाखो रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांनी आशेपोटी व्याजाने पैसे काढून बॅंकेची कर्ज पॉलिसी काढली आहे. प्रत्येकाकडून अंदाजे २० ते ४० हजार वसूल करून हा संचालक हा पसार झाला. पोलिसांनी त्याला तातडीने अटक करावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली.

जादा परतावा देण्याच्या बहाण्याने चंदगड अर्बन निधी बॅंकेने फसवणूक केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात फसवणूक झालेल्या नागरिकांकडील कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल.
- नंदकुमार बिडवई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com