आपल्या किमान 100 जागा कायम राहिल्या पाहिजेत- चंद्रकांत पाटील

प्रविण डोके
सोमवार, 22 जुलै 2019

महाराष्ट्रात 40 जागांवर पक्ष म्हणून आपण निश्चित जिंकणार अशी स्तिथी आहे. महाराष्ट्रात जेंव्हा शंभर जगावर वाटेल ते झालं तरी या पेक्षा जागा कमी येणार नाहीत अशी परिस्थिती येईल. त्यावेळी आपलं संघटन मजबूत असेल. आपल्या किमान 100 जागा कायम राहिल्या पाहिजेत असे चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

पुणे :  महाराष्ट्रात 40 जागांवर पक्ष म्हणून आपण निश्चित जिंकणार अशी स्तिथी आहे. महाराष्ट्रात जेंव्हा शंभर जगावर वाटेल ते झालं तरी या पेक्षा जागा कमी येणार नाहीत अशी परिस्थिती येईल. त्यावेळी आपलं संघटन मजबूत असेल. आपल्या किमान 100 जागा कायम राहिल्या पाहिजेत असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना युतीच्या 220 जागा येणार असल्याचे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदशन करताना केले.

मध्य प्रदेशातील कार्यकर्त्यांनी रक्त आटवले म्हणून तिकडे संघटन मजबूत आहे. येणाऱ्या निवडणुकीत 220 जागा येणार आहेत. त्यानंतर पुढील पाच वर्षात आपल्याला असं काम करायचं आहे की काहीही झालं तरी आपल्या जागा शंभर पेक्षा कमी होता काम नये. यासाठीच इथून पुढे आपल्याला काम करायचं आहे. जी संधी मिळेल त्याचे सोनं करा. सतत काम करत राहा. कोणताही सण सोडू नका. नागरिकांच्या सगळ्या अडचणी सोडवा.

पाच वर्ष भाजप आणि शिवसेनेचे सरकार होते. पाच वर्ष सरकार टिकवणे आणि लोकांना विश्वासात घेणे सोपं नाही. असेही यावेळी पाटील म्हणाले. आमदार योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, दिलीप कांबळे, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, सरचिटणीस मुरलीधर मोहळ, नगरसेवक प्रवीण चोरबोले, श्रीनाथ भीमले, राजश्री शिळीमकर, कविता वैरागे आदी यावेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil BJP Partyworkers meeting in Pune