आपली परंपरा ही शिवाजी महाराज, टिळक आणि हेडगेवारांची आहे- चंद्रकांत पाटील

प्रविण डोके
सोमवार, 22 जुलै 2019

आपली परंपरा शिवाजी महाराजांची, टिळकांची आणि हेडगेवारांची आहे. सावरकरांची आहे. ही संस्कृती आपल्याला पुढे घेऊन जायची असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 
 

पुणे : आपली परंपरा शिवाजी महाराजांची, टिळकांची आणि हेडगेवारांची आहे. सावरकरांची आहे. ही संस्कृती आपल्याला पुढे घेऊन जायची असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

काँग्रेस हा पक्ष नसून संस्कृती आहे. काँग्रेस म्हणजे जातीयता, काँग्रेस म्हणजे घराणेशाही, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार. ही संस्कृती बदलून आपली संस्कृती आणणे हे आपले पुढील पाच वर्षातील धोरण आहे. पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. म्हणून भविष्यात काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हे आपले धोरण असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रात स्वतःच्या ताकदीवर सरकार आणायचे म्हणले तर कमीत कमी 01 कोटी 67 लाख मते लागतात. येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात 01 कोटी 70 लाखापेक्षा जास्त मते घेऊन भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

यापुढे हार बुके अनु नका. हार, तुरे सगळे घरी देवाला देवाला ठेवा. जे हार तुरे आणतील त्यांना यापुढे नमस्कार, यापुढे साधेपणाने वागू. पुण्यात सगळ्यात मोठी सभा घेऊ, असेही पाटील यावेळी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil Criticise on Congress In Pune