सावरकर मंडळाचा उपक्रम स्तुत्य - पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पिंपरी - ‘‘राज्यातील अनेक तरुणांना सैन्य दलात जाण्याची इच्छा आहे. त्यांच्यात ऊर्जा, क्षमता आहे. परंतु, आर्थिक अडचणींमुळे तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. योग्यवेळी योग्य दिशा मिळत नसल्याने अनेक युवकांचे सैन्यदलात जाण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यासाठी निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने सुरू केलेला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम स्तुत्य आहे,’’ असे गौरवोद्‌गार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. 

निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे गतवर्षीपासून सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा विभागात मार्गदर्शन घेऊन ‘एनडीए’मध्ये निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. 

रमेश बनगोंडे, आनंद रायचूर, दीपक नलावडे, भास्कर रिकामे आदी उपस्थित होते. मंडळाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन घेऊन देशात ५८ वा क्रमांक मिळवून एनडीएच्या १४१ व्या तुकडीत दाखल होणाऱ्या साहील बिरजे याचा सत्कार पाटील यांच्या हस्ते केला. 

मंडळाचे भास्कर रिकामे यांनी मार्गदर्शन वर्गाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘सावरकर मंडळातर्फे ब्रिगेडियर बलजीतसिंग गिल व ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी विद्यार्थ्यांची लेखी व तोंडी परीक्षेची तयारी करून घेतली. काही मुलांचे शुल्क मंडळाच्या पदाधिकारी व देणगीदारांनी भरले. एप्रिल व मे महिन्यात सुरू होणाऱ्या वर्गासाठी जानेवारी २०१९ मध्ये नावनोंदणी सुरू होणार आहे. याचा जास्तीत-जास्त मुलांनी लाभ घ्यावा.’

Web Title: Chandrakant Patil Sahil Birje