राज्य सरकारने फडणवीस, दरेकरांवर खुशाल गुन्हा दाखल करावा - चंद्रकांत पाटील

राज्य सरकारने फडणवीस, दरेकरांवर खुशाल गुन्हा दाखल करावा - चंद्रकांत पाटील

वारजे माळवाडी : “केवळ भाजपला श्रेय मिळू नये, म्हणून राज्यातील कोरोना रुग्णांना ६० हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची व्यवस्था होत असताना संबंधित पुरवठादारालाच पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करण्याची राज्य सरकारकडून धमकी दिली जात आहे. याबाबत राज्य सरकारने गुन्हा दाखल करायचा असेल तर खुशाल गुन्हा दाखल करावा.” असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुण्यात दिला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे राज्यातील परिस्थिती राज्य सरकारच्या हाताबाहेर जाते आहे. राज्य सरकार फक्त केंद्रावर खोटे आरोप करत आहे. मात्र, ही वेळ काही राजकारण करण्याची नाही. असे असेल तर, आम्हीही राजकारणात माहीर असल्याचा इशारा देखील आमदार पाटील यांनी दिला.

राज्य सरकारने फडणवीस, दरेकरांवर खुशाल गुन्हा दाखल करावा - चंद्रकांत पाटील
उच्च शिक्षणासाठी पुण्या-मुंबईपेक्षा स्थानिक महाविद्यालयात प्रवेश निश्‍चिती

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या वतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे सुरु केलेल्या Covid Care Centre ला भेट दिली. तेथील 450 रुग्णांसाठी शतप्लस हे आयुर्वेदिक औषध भेट दिले. यावेळी पाटील पत्रकारांशी बोलत होते. संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे, महेश पोहनेरकर, धनंजय काळे, भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर, बी.व्ही.जी.चे हनुमंत गायकवाड, सचिन भोसले यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर बोलणे होऊनही ते उपलब्ध होत नसल्याची खोटी माहिती दिली. केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस सर्वाधिक मिळूनही लसींचा तुटवडा असल्याचे आरोप राज्याने केला होता. गुजरातच्या अन्न व औषध प्रशासनाने रेमडेसिव्हिर बाबत आदेश दिले आहेत तसेच आदेश महाराष्ट्रानेही दिले आहेत.

वापीतून साठ हजार रेमडेसिव्हिर आणण्यासाठी प्रवीण दरेकर यांनी एक पुरवठादार शोधला. मात्र कंपनीने आगाऊ रक्कम देण्याची मागणी केली. दरेकर यांनी राज्याचे अन्न औषध प्रसाशन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना आगाऊ रक्कम देण्याविषयी सांगितले. मात्र, राज्य सरकार आगाऊ रक्कम देत नसल्याचे शिंगणे यांनी सांगितले. तेव्हा तुम्ही आगाऊ रक्कम देणार नसाल, तर आम्ही ही इंजेक्शन खरेदी करतो, असे दरेकरांनी सांगितल्यानंतर तशी परवानगी दिली गेली. मात्र, नंतर या पुरवठादारालाच पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजपला श्रेय मिळू नये, यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप पाटील यांनी केला.

खाटा, औषधे, इंजेक्शन साठी सर्वसामान्य नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक लोकप्रतिनिधींना स्वस्थ बसू देणार नाहीत. राज्यातील चार जिल्हाधिकाऱ्यांनीही मला इंजेक्शनाच्या मदतीसाठी विनंती केली. मग मुख्यमंत्री करतात तरी काय, असा सवाल पाटील यांनी केला.

राज्य सरकारने फडणवीस, दरेकरांवर खुशाल गुन्हा दाखल करावा - चंद्रकांत पाटील
'सोन्या' म्हटल्याच्या रागातून बुलेट चालकासह 2 महिलांना मारहाण; हडपसरमधील घटना

मुख्यमंत्री उद्योजकांना भेटत नाहीत

राज्यात इंजेक्शन, ऑक्सिजन उपलब्ध नसताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून उद्योजकांना भेटत नाहीत, ते निर्णय घेत नाहीत, काहीही प्रयत्न करत नाही. नागपूरमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस दोघेही धडाडीने काम करत आहेत. राज्य सरकार मात्र खोटे आरोप करून जनतेला वेडे बनवत आहे. मात्र, संकटकाळात एकत्रित काम करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे, असे पाटील म्हणाले.

क्रिकेटपटू हरभजन सिंगची पुण्याला मदत

पुण्याची कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहून क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी माझ्याशी संपर्क साधला. दररोज दोन हजारहून अधिक कोरोना चाचण्या होतील, अशी मोबाइल व्हॅन ते पुण्याला पुरविणार आहेत. त्यासाठीचा सर्व खर्च क्रिकेटपटू हरभजन सिंगच करणार आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. येत्या आठ ते दहा दिवसात पुण्यामध्ये सुमारे २००० ऑक्सिजन खाटांची व्यवस्था भारतीय जनता पक्षातर्फे केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात लसींचा काळाबाजार

लशींच्या बाबतीत राज्यात काळाबाजार झाला आहे, असा आरोप करून चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात ४५ पेक्षा कमी वयाच्या अनेकांना लस दिल्या गेल्या आहेत. दरम्यान, २३ लाख लस शिल्लक असताना लस नसल्याचा दावा करीत लसीकरण केंद्र बंद केली होती. केंद्र सरकारने आकडेवारी दिल्यानंतर महाराष्ट्राला सर्वाधिक लस मिळाल्याचे स्पष्ट झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com