Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटलांच्या प्रचाराची सुरूवात मोती बागेतून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पुणे : "मी पुणेकरांना परका नाही" अशी भावनिक साद घालून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून संघाचे मुख्यालय असलेल्या 'मोती बाग'तून प्रचाराची सुरूवात केली. 

पुणे : "मी पुणेकरांना परका नाही" अशी भावनिक साद घालून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातून संघाचे मुख्यालय असलेल्या 'मोती बाग'तून प्रचाराची सुरूवात केली. 

बुधवारी सायंकाळी कोथरूड येथील आशिष गार्डन येथे होणार्या मेळाव्याच्या पूर्वी चंद्रकांत पाटील हे मोती बागेत आले. खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आदी यावेळी उपस्थित होते. 

चंद्रकांत पाटील मोती बागेत आल्यानंतर तेथील प्रचारकांनी स्वागत केले. त्यानंतर भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावेळी पाटील यांनी व्यक्त केले. प्रचारकांशी चर्चा केली. सुमारे २५ मिनिंट मोती बागेत थांबल्यानंतर पाटील कोथरूडच्या दिशेने रवाना झाले. 

भाजपच्या कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर झाला की, ते मोती बागेत येऊन भारत मातेला वंदन करतात, तसेच निवडून आल्यावरही ते मोती बागेत येतात, असे प्रचारकांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil starts campaigning of Vidhan Sabha 2019 from the Moti Bag in pune