'पंटर'वरून राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य

मिलिंद संगई
रविवार, 12 मे 2019

बारामती : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दुष्काळावरील चर्चेचे जाहीर आव्हान देताना 'तुमचे पंटर' असा शब्दप्रयोग केला होता, राष्ट्रवादीने आता या शब्दाला आक्षेप घेत पाटील यांना लक्ष्य केले आहे.
 

बारामती : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दुष्काळावरील चर्चेचे जाहीर आव्हान देताना 'तुमचे पंटर' असा शब्दप्रयोग केला होता, राष्ट्रवादीने आता या शब्दाला आक्षेप घेत पाटील यांना लक्ष्य केले आहे.
 
बारामतीतील राष्ट्रवादी सोशल मिडिया तालुका उपाध्यक्ष अक्षय होळकर व सौरभ राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लिहीलेल्या खुल्या पत्रात ''आपल्या तोंडी पंटर हा शब्द ऐकून धक्का बसला'', असे नमूद केले आहे, त्यात ते म्हणतात की, ''महाराष्ट्रातील एका मंत्र्यांकडून पंटर हा शब्द येणे योग्य नाही, टपोरी किंवा गुन्हेगारी टोळ्यांबाबत बोलताना या शब्दाचा वापर केला जातो, पवार यांच्याविषयी असा शब्दप्रयोग करण्याचे बाळकडू आपल्याला आपल्या मातृसंस्थेकडूनच मिळाले असावे, तुमच्या पक्षात परस्परांना पंटर म्हणण्याची गेल्या पाच वर्षात कदाचित पध्दत रुढ झाली असावी, पण आम्ही राष्ट्रवादीचे पंटर नसून कार्यकर्ते आहोत.''

दरम्यान, ''पाटील यांच्याशी आम्ही दोघे जाहीर चर्चेला तयार आहोत, त्यांनी वेळ व ठिकाण सांगावे आम्ही चर्चा जरुर करु'', असे आव्हानही या दोघांनी दिले आहे. पाटील यांना लिहिलेल्या या खुल्या पत्रात विविध प्रश्न उपस्थित करुन त्यावर मंत्री महोदयांनी उत्तर द्यावे असे आव्हानही होळकर व राऊत यांनी दिले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil is targeted due to on 'Pantar' word from NCP