दीपोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पुणे : सारसबागेत गुरुवारी (ता. 8) आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. पहाटे तीन वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत हा बदल राहील, अशी माहिती शहर वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्‍त तेजस्वी सातपुते यांनी दिली. 

बंद रस्ते आणि कंसात पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे : 
* जेधे चौकाकडून जिजाऊ कॉर्नरसमोरून गणेश कला क्रीडा मंच ते सारसबागेकडे जाणारा रस्ता बंद राहील (जेधे चौकाकडून- व्होल्गा चौकातून उजवीकडे वळून मित्रमंडळ चौक- सावरकर चौक- सिंहगड रस्ता- दांडेकर पूलमार्गे इच्छित स्थळी जाता येईल). 

* पंचमी चौक- सिटी प्राईडकडून सारसबागेकडे पुलावरून जाणारा रस्ता बंद राहील (व्होल्गा चौकातून पुलाखालून डावीकडे वळून मित्रमंडळ 
चौक- सावरकर चौक- सिंहगड रस्ता- दांडेकर पूलमार्गे). 

* सेव्हन लव्हज चौकमार्गे सारसबागेकडे जाणारा रस्त्यावरील गेड सेपरेटर बंद राहील. (ग्रेड सेपरेटरमधून न जाता जेधे चौकातून डावीकडे वळून व्होल्गा चौकातून उजवीकडे वळावे. तेथून मित्रमंडळ चौक-सावरकर चौक- सिंहगड रस्ता-दांडेकर पूलमार्गे). 

* मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स लेन येथून सारसबागेकडे जाणारा रस्ता बंद (टिळक रस्त्याने जेधे चौकातून पुलाखालून डावीकडे वळून मित्रमंडळ चौक- सावरकर चौक, सिंहगड रस्ता- दांडेकर पूलमार्गे). 

* सावरकर चौकातून सारसबागेसमोरून पुरम चौकाकडे जाणारा रस्ता बंद (सावरकर चौकातून सिंहगड रस्त्याने दांडेकर पूलमार्गे इच्छित स्थळी जाता येईल) 

सावरकर चौक ते सणस पुतळ्यापर्यंत गुरुवारी पहाटेपासून गर्दी संपेपर्यंत नो-पार्किंग करण्यात येईल. तसेच पार्किंगच्या ठिकाणी वाहने एकेरी पार्किंग करावीत. पार्किंगची ठिकाणे- पाटील प्लाझा, मित्रमंडळ कॉलनी परिसर, पेशवे पार्क परिसरातील अंतर्गत गल्ली, सावरकर पुतळा ते पर्वती पायथा पुलापर्यंत. 
 
Web Title: Change of transport root for Diwali festival