स्वतःला बदला, जग बदलेल, प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल

रमेश मोरे
गुरुवार, 21 जून 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी व परिसरात २१ जुन जागतिक योगदिनानिमित्त येथील योग वर्ग डॉक्टर संघटना, मित्रमंडळे, शाळांमधुन योग दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, पी.डब्ल्यु.डी.मैदान, शिवसृष्टी उद्यान येथे रोज व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकाच्या वतीने योग वर्गाचे प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग व्यायाम व सुर्यनमस्काराने योगदिन साजरा करण्यात आला. 

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मधुबन येथे डॉ राजेंद्र लोखंडे डॉ परमेश्वर टेकाळे योगा प्रशिक्षक डॉ गणेश रामदासी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, जेष्ठनागरीकांसह योग प्रात्यक्षिके करून योग व उपचाराची माहिती दिली. 

येथील सुंदराबाई भानसिंग हुजा ईंग्रजी स्कुल येथे शोभा वरटी, ज्योत्सना बनसोडे, नेहा मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी योग व्यायाम केला. यावेळी मुलांना योग व्यायाम प्रकारांची माहिती व फायदे सांगण्यात आले. येथील सुर्यनमस्कार मंडळाच्या वतीने बँडमिंटन हॉल येथे योगदिन साजरा करण्यात आला.मराठी प्राथमिक शाळा, लिटल फ्लॉवर ईंग्लीश स्कुल, नरसिंह प्राथमिक शाळा, कै.सौ.शकुंतलाबाई शितोळे शाळा आदी शाळांमधुन योगदिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात डॉक्टर संघटनेच्या वतीने नागरीकांना योग व्यायाम व रोगांवर योग उपचाराची माहिती देण्यात आली. 

यावेळी डॉ संदीप नारखेडे, डॉ. गोपाळ देठे, डॉ.सौरभ भांडेकर, डॉ सुनील भोये, डॉ प्रशांत रोकडे, डॉ.अशोक चव्हाण, डॉ स्वप्निल झोरे, डॉ श्रीकांत जाधव, डॉ राजेंद्र काटेगावकर, डॉ अमृता रोकडे, डॉ.स्नेहल टेकाळे, डॉ.सोनल रहाणे, डॉ.कृतीका रामदासी, डॉ. राहुल रहाणे, जेष्ठ नागरिक श्री नरेंद्रभाऊ चौधरी, श्री नारायण हिरवे, श्री सुधीर पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Change yourself, the world will change, yoga will be pleasant every day