Changed new wards of Pune
Changed new wards of Punesakal

पुण्याचे बदललेले नवे प्रभाग आहेत अशा प्रकारे...

महापालिकेच्या ५८ पैकी ३२ प्रभागांच्या सीमा बदलल्या आहेत. त्यांचा घेतलेला आढावा...
Summary

महापालिकेच्या ५८ पैकी ३२ प्रभागांच्या सीमा बदलल्या आहेत. त्यांचा घेतलेला आढावा...

महापालिकेच्या ५८ पैकी ३२ प्रभागांच्या सीमा बदलल्या आहेत. त्यांचा घेतलेला आढावा...

प्रभाग क्र. : ११ बोपोडी- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

  • प्रारूप प्रभागातील लोकसंख्या : ५७,८६१

  • अंतिम लोकसंख्या : ६२,२६९

  • लोकसंख्येत झालेली वाढ : ४,४०८

  • नव्याने जोडण्यात आलेला भाग : मॉडेल कॉलनीचा काही भाग, सिद्धार्थनगर, स्पायसर कॉलेज ते औंध आणि परिसरातील भाग नव्याने जोडला आहे.

  • काय होणार : भाजप-आरपीआयविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत. उच्चभ्रू वर्ग, वस्त्या आणि मतदारांची संख्या पाहता भाजपला अनकुल

प्रभाग क्र. : १२ औंध-बालेवाडी

  • प्रारूप प्रभागातील लोकसंख्या : ६२,०५०

  • अंतिम लोकसंख्या : ६३,३६२

  • लोकसंख्येत झालेली वाढ : १,३१२

  • नव्याने जोडण्यात आलेला भाग : बाणेर प्रभागात यापूर्वी असणारी विधाते वस्ती. मुख्यत: माळी समाजाचे वास्तव्य अधिक असणारा भाग या प्रभागाला जोडला गेला

  • काय होणार : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत. वस्ती आणि उच्चभ्रू सोसायट्या अधिक. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून उमेदवार कोण असेल, यावर पुढील चित्र अधिक स्पष्ट होईल.

प्रभाग क्र. : १३ बाणेर-सूस-म्हाळुंगे (दोन सदस्यांचा प्रभाग)

  • प्रारूप प्रभागातील लोकसंख्या : ३७, ५८९

  • अंतिम लोकसंख्या : ३८,६६९

  • लोकसंख्येत झालेली वाढ : ५,७७०

  • नव्याने जोडण्यात आलेला भाग : बालेवाडीचा काही भाग

  • काय होणार : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात रंगणार चुरस. भौगोलिकदृष्ट्या व्याप्ती वाढली असली, तरी त्यातुलनेत मतदारांची संख्या कमी. बाणेर, बालेवाडी भागात नात्यागोत्याच्या राजकारणावर भर. गावठाण हा सर्वाधिक मतदारसंख्या असणारा भाग असल्याने तेथील मतदारांचा प्रभाव

प्रभाग क्र. : १४ पाषाण-बावधन बुद्रुक

  • प्रारूप प्रभागातील लोकसंख्या : ५८,५१५

  • अंतिम लोकसंख्या : ५७,९९५

  • कमी झालेली लोकसंख्या : ५२०

  • नव्याने आलेला भाग : रामनदीच्या पट्ट्यातील वरील भाग; संपूर्ण बावधन बुद्रुकमधील मुख्यत- महामार्गाच्या पलीकडील भागाचा समावेश. बावधन खुर्दमधील काही भाग जोडला आहे.

  • काय होणार : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत. उच्चभ्रू सोसायट्यांबरोबरच गावठाण आणि वस्तीचा भागामुळे मतविभागाची शक्यता. परराज्यातील मतदारांची संख्या अधिक

प्रभाग क्र. : १५ गोखलेनगर-वडारवाडी (पूर्वीचे नाव - पंचवटी-गोखलेनगर)

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६७,८२१

  • अंतिम लोकसंख्या - ६८३४१

  • नव्याने वाढलेली लोकसंख्या - ५२०

  • नव्याने जोडलेला भाग - प्रभात रस्त्याचा भाग जोडला गेला आहे

  • काय होणार - आघाडीला फायदा होण्याची शक्यता. जोडला गेलेला भाग बहुजन वस्ती असलेला. जास्त बदल न झाल्याने नवीन प्रतिस्पर्धींना संधी कमी. जोडला गेलेला भाग वस्ती स्वरूपाचा.

प्रभाग क्र. : १६ फग्युर्सन महाविद्यालय- एरंडवणे

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६७१०३

  • अंतिम लोकसंख्या - ६५७०८

  • कमी झालेली लोकसंख्या - १३९५

  • नव्याने जोडलेला भाग - राजाराम पूल व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाजवळचा भाग तोडला गेला.

  • काय होणार - भाजपचे प्राबल्य असलेला प्रभाग. त्यामुळे भाजपच्या मतपेटीवर परिमाण होण्याची शक्यता. संमिश्र वस्ती असलेला भाग तोडण्यात आला आहे. जास्त बदल न झाल्याने विरोधकांना जास्त फायदा होण्याची शक्यता कमी. विकासकामे आणि मतदारांशी संबंध हे मुद्दे उमेदवारांसाठी महत्त्व असणार.

प्रभाग क्र. : २४ मगरपट्टा-साधना विद्यालय

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५६४४६

  • अंतिम लोकसंख्या - ५३८४३

  • कमी झालेली लोकसंख्या - २६०३

  • कमी केलेला भाग - रोया स्टोनीला सोसायटी, भीमनगर कॉलनी, दळवीनगर आदी सोसायटी वगळल्या

  • काय होणार - राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक प्रभाग. अनेक वर्षांपासून सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे. बदललेल्या प्रभागाचा राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता

प्रभाग क्र. : २५ हडपसर गावठाण-सातववाडी

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५५,७८२

  • अंतिम लोकसंख्या - ५७३८५

  • नव्याने वाढलेली लोकसंख्या - १६०३

  • नव्याने जोडलेला भाग - एम्प्रेस गार्डन ह्यू, मदर तेरेसा पार्क, कवडे मळा असे भाग जोडले गेले आहेत

  • काय होणार - बदलाचा भाजप आणि राष्ट्रवादीचा समसमान फायदा होऊ शकतो. एकत्रित विचार करता बदल आघाडीला फायदेशीर ठरू शकते. राष्ट्रवादीमधून इच्छुकांची संख्या जास्त आहे. उड्डाणपुलाचा मुद्दा ठरणार महत्त्‍वाचा. जोडण्यात आलेली लोकसंख्या संमिश्र लोकवस्तीची.

प्रभाग क्र. : २६ वानवडी गावठाण - वैदुवाडी

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६७७२१

  • अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५९०२०

  • कमी झालेली लोकसंख्या - ८७०१

  • कमी केलेला भाग - सोलापूर रस्त्याला लागून असलेला रामटेकडी भाग काढून ४२ ला जोडण्यात आला.

  • काय होणार - अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असल्याने आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा, तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसचे वर्चस्व असेल.

प्रभाग क्र. : ३० जयभवानीनगर- केळेवाडी

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६०२३७

  • अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६५१७७

  • वाढलेली एकूण लोकसंख्या - ४९४०

  • नव्याने जोडलेला भाग - सुतारदरा व परिसरातील वस्ती

  • कमी केलेला भाग - पौड रस्ता, सर्व्हे क्रमांक ४४ येथील भाग कमी केला.

  • काय होणार - राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत. आघाडी न झाल्यास काँग्रेसमुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार

प्रभाग क्र. : ३१ कोथरूड गावठाण- शिवतीर्थनगर

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६१११५

  • अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६५४६९

  • वाढलेली लोकसंख्या - ४३५४

  • नव्याने आलेला भाग - लोकमान्य कॉलनी, परमहंसनगर, शिक्षकनगरचा पूर्ण भाग

  • काय होणार - शिवसेनेसाठी अधिक सुरक्षित प्रभाग. भाजपचेही आव्हान राहणार

प्रभाग क्र. : ३२ भुसारी कॉलनी- बावधन

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६७१२७

  • अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६०९५२

  • वाढलेली लोकसंख्या - ६,१७५

  • नव्याने आलेला भाग - लोकमान्य कॉलनी, परमहंस नगर, शिक्षक नगरचा पूर्ण भाग

  • काय होणार - भाजप- राष्ट्रवादीत स्पष्ट लढत

प्रभाग क्र. : ३३ आयडियल कॉलनी - महात्मा सोसायटी

  • प्रारूप प्रभागाची लोकसंख्या - ६६, २१६

  • अंतिम लोकसंख्या - ६४,९१८

  • लोकसंख्येत झालेली घट - १२९८

  • वगळेलेला भाग - चांदणी चौकापासून ते बावधनचा परिसर

  • (काही झोपडपट्टीचा भाग वगळता, बहुतांशी भाग सोसायट्यांचा आणि सुशिक्षित मतदारांची संख्या अधिक)

  • काय होणार - भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे बलाबल. १४ किलोमीटरचा प्रभाग कमी झाला. उमेदवारांची दमछाक कमी.

प्रभाग क्र. : ३४ वारजे - कोंढवे, धावडे

  • प्रारूप प्रभागाची लोकसंख्या - ६४, ९१९

  • अंतिम लोकसंख्या - ६७,८३८

  • वाढलेली एकूण लोकसंख्या - २,९१९

  • नव्याने जोडलेला भाग - विवेकानंद सोसायटी, राजयोग सोसायटी आणि काही भाग (सोसायटी आणि सुशिक्षित मतदारांची संख्या अधिक)

  • काय होणार - राष्ट्रवादी काँग्रेस आणि भापजमध्ये टक्कर

प्रभाग क्र. : ३५ रामनगर-उत्तमनगर

  • प्रारूप प्रभागाची लोकसंख्या - ६७,४२२

  • अंतिम लोकसंख्या - ६४, ५०३

  • लोकसंख्येत झालेली घट - २,९२०

  • नव्याने जोडलेला भाग - नक्षत्र सोसायटी, एकता कॉलनी

  • काय होणार - राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्राबल्य

प्रभाग क्र. : ३६ कर्वेनगर

  • प्रारूप प्रभागाची लोकसंख्या - ६७,२६०

  • अंतिम लोकसंख्या - ६६, ८३४

  • लोकसंख्येत झालेली घट - ४२६

  • नव्याने जोडलेला भाग - वारजेचा काही भाग, दुधाणेनगर, एसएस टॉवर, शंकरराव मोरे, श्रीधर कॉलनी (मोठ्या संख्येने सोसायट्यांचा भाग, ५० टक्के गावकरी, ५० टक्के बाहेरील मतदार)

  • काय होणार - स्थानिक उमेदवाराला फायदा. भाजपला मानणारा गट अधिक.

प्रभाग क्र. : ३७ जनता वसाहत-दत्तवाडी

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६७,३३२

  • अंतिम लोकसंख्या - ६९,६७२

  • वाढलेली एकूण लोकसंख्या - २३४०

  • नव्याने जोडलेला भाग - राजेंद्रनगर (झोपडपट्टी आणि सोसायट्यांचा भाग)

  • काय होणार - भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये टक्कर

प्रभाग क्र. : ३८ शिवदर्शन-पद्मावती

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६६,५६१

  • अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६४,२२१

  • कमी झालेली लोकसंख्या - २३४०

  • कमी झालेला भाग - जयभवानीनगर आणि आंबिलओढा कॉलनी (सोसायटी आणि सुशिक्षित मतदारांची संख्या अधिक)

  • काय होणार - सध्या भाजप वरचढ, पण आघाडी झाली तरी विरोधकांना संधी

प्रभाग क्र. : ३९ मार्केट यार्ड-महर्षिनगर

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५९,५८०

  • अंतिम लोकसंख्या - ६०,५३७

  • नव्याने वाढलेली लोकसंख्या - ९३७

  • नव्याने जोडलेला भाग - आंबेडकर झोपडपट्टी, प्रेमनगरसह अंतर्गत बदल (सोसायटी, वस्ती आणि झोपडपट्ट्यांमुळे संमिश्र मतदार)

  • काय होणार - भाजप वरचढ, काँग्रेस आणि शिवसेनेला झगडावे लागेल

प्रभाग क्र. : ४० गंगाधाम-सॅलिसबरी पार्क

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५९,८८२

  • अंतिम लोकसंख्या - ६२,७४०

  • नव्याने वाढलेली लोकसंख्या - २८५४

  • नव्याने जोडलेला भाग : पारसी कॉलनी, कुबेरा पार्क, बकरी हिल परिसर (सोसायट्यांचा आणि सुशिक्षित मतदारांमुळे भाजपला अनुकूल)

  • काय होणार - विरोधी पक्षांना सक्षम उमेदवारांची गरज

प्रभाग क्र. : ४१ कोंढवा खुर्द-मिठानगर

  • प्रारूप प्रभागातील लोकसंख्या : ५५, ८२५

  • अंतिम लोकसंख्या : ६६, १५०

  • लोकसंख्येत झालेली वाढ : १०,३२५

  • नव्याने बदल : आश्रफनगरचा उर्वरित भाग जोडण्यात आलेला आहे.

  • काय होणार - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा. प्रभाग ४२ व प्रभाग ४७ मधील काही भाग जोडण्यात आला. त्यामुळे भाजपची या प्रभागातील ताकद कमी करण्याचा प्रयत्न.

प्रभाग क्र. : ४२ रामटेकडी-सय्यदनगर

  • प्रारूप प्रभागातील लोकसंख्या :५४,०२६

  • अंतिम लोकसंख्या : ४९,०२५

  • लोकसंख्येत झालेली घट : ५००१

  • नव्याने बदल : रामटेकडीचा जुना भाग वगळण्यात आला आहे. काही भाग प्रभाग ४१ व ४३ मध्ये वर्ग करण्यात आला आहे.

  • मुस्लिमबहुल भाग असल्याने याचा थेट फायदा राष्ट्रवादीला होताना दिसतो.

प्रभाग क्र. : ४३ वानवडी-कौसरबाग

  • प्रारूप प्रभागातील लोकसंख्या : ५९,४१४

  • अंतिम लोकसंख्या : ६६,४६८

  • लोकसंख्येत झालेली वाढ : ७०५४

  • नव्याने जोडण्यात आलेला भाग : कोंढव्यातील भीमनगर, सूर्या सोसायटी, पीर बाबा दर्गा परिसर, एनआयबीएमची दोन्ही बाजू.

  • काय होणार - वानवडीचे दोन भागांत विभाजन. कौसरबाग परिसरात मुस्लिमांची संख्या अधिक. राष्ट्रवादीला फायदेशीर आहे.

  • सोसायट्यांची संख्या अधिक. मात्र त्याचे विभाजन झाल्याने भाजपला फटका.

प्रभाग क्र. : ४४ काळेबोराटेनगर-ससाणेनगर

  • प्रारूप प्रभागातील लोकसंख्या : ५५,२८७

  • अंतिम लोकसंख्या : ५५,७३७

  • लोकसंख्येत झालेली वाढ : ४५० नवा बदल : फारसा बदल नाही.

  • काय होणार - मुस्लिमबहुल भाग आहे. राष्ट्रवादीला फायदेशीर ठरेल.

प्रभाग क्र. : ४६ महंमदवाडी-उरुळी देवाची

  • प्रारूप प्रभागरचनेतील लोकसंख्या - ५६,०४७

  • अंतिम लोकसंख्या - ५२,७२०

  • कमी झालेली लोकसंख्या - ३३२७

  • नव्याने पिसोळी, फुरसुंगी पार्ट, रुणवाल डॅफोडिल्स हा भाग वाढला

  • नव्याने समाविष्ट गावांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी

प्रभाग क्र. : ४७ कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५५,६६२

  • अंतिम लोकसंख्या - ५४,४९२

  • कमी झालेली लोकसंख्या - १ हजार १७०

  • मुस्लीम बहुल अश्रफनगर हा भाग कमी केला

  • गोकुळनगरमधील काही भाग नव्याने समाविष्ट झाला

  • मोठ्या प्रमाणात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील स्थलांतरित वर्ग

  • काय होणार? - राष्ट्रवादी, भाजप प्रमुख लढाई

प्रभाग क्र. : ५० सहकारनगर-तळजाई

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६२,३९८

  • अंतिम लोकसंख्या - ६१,२४४

  • कमी झालेली लोकसंख्या - १ हजार १५४

  • कमी झालेल्या लोकसंख्येचा फारसा परिणाम नाही

  • काय होणार? - राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रामुख्याने लढत

  • (दोन्ही पक्षांचा पारंपारिक मतदार)

प्रभाग : ५३ खडकवासला-नऱ्हे

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६३,५२५

  • अंतिम लोकसंख्या - ५७,९०१

  • कमी झालेली लोकसंख्या - ५,६२४

  • वगळलेला भाग - सणस विद्यालय परिसर, मानाजीनगरचा भाग, नऱ्हे येथील ग्रीनलँड काउंटी व आदित्य संस्कृती या सोसायट्या.

  • नवा भाग - नऱ्हे गावठाण, जुने धायरी

प्रभाग : ५४ धायरी-आंबेगाव

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५८,४४७

  • अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ६४,०७१

  • वाढलेली एकूण लोकसंख्या - ५ हजार ६२४

  • नव्याने जोडलेला भाग - नऱ्हे ग्रामपंचायतीच्या चार वॉर्डांचा समावेश. मानाजीनगर, ग्रे लॅंड सोसायटी, कुटे मळा व ग्रामपंचायतीच्या परिसराचा समावेश

प्रभाग : ५८ कात्रज-गोकूळनगर

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५५,७३०

  • अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५७,८४७

  • कमी झालेली लोकसंख्या - दोन हजार ११७

  • वगळलेला भाग - आंबेगाव बुद्रुकमधील काही भाग वगळला असल्याची शक्‍यता

  • काय होणार - गुजर-निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी या नव्याने समाविष्ट गावांमुळे भूमिपुत्र, गावकी-भावकीच्या राजकारणाला महत्त्व.

प्रभाग : ५६ चैतन्यनगर-भारती विद्यापीठ

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५७,४८१

  • अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५६,३२७

  • वाढलेली एकूण लोकसंख्या - १,१५४

  • नव्याने जोडलेला भाग - फारसा बदल नाही

  • काय होणार - स्थलांतरीत नागरिक स्थायिक झालेल्या भागाचा विकास. राष्ट्रवादी व मनसेमध्ये चुरस होण्याची शक्‍यता.

प्रभाग : ५७ सुखसागरनगर-राजीव गांधीनगर

  • प्रारूप प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५५,६४३

  • अंतिम प्रभाग रचनेतील लोकसंख्या - ५५,९७१

  • कमी झालेली लोकसंख्या - ३२८

  • वगळलेला भाग - किरकोळ प्रमाणात बदल

  • काय होणार - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य, मात्र जुन्या प्रभाग क्रमांक ४१ मध्ये भाजपचे तीन नरगसेवक असल्याने भाजपचे तगडे आव्हान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com