कोरेगाव भीमाला जातायं? असा आहे वाहतुकीचा मार्ग

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 December 2019

- कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादनानिमित्त वाहतुकीमध्ये बदल 
- मंगळवारी रात्री 11 ते बुधवारी रात्री 12 पर्यंत असणार वाहतुकीमध्ये बदल 
- बससह सर्व जड वाहनांच्या चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पुणे : कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या बससह सर्व जड वाहनांच्या चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

कोरेगाव भीमा प्रकरण : संशयितांवर होणार आरोप निश्चिती

''विजयस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम हा पुणे नगर महामार्ग क्रमांक 60 च्यालगत असणाऱ्या भीमा नदीच्या तिरावर होणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरला रात्री 11 वाजल्यापासून ते बुधवारी एक जानेवारीला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत वळविण्यात येणार आहेत'' असा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. त्यानुसार वाहनचालकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असेही आवाहन करण्यात आले आहे. 

'यांनी' रचला होता पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट 

असा आहे वाहतूकीचा मार्ग
- नगरहून पुण्याकडे येणारी वाहने शिक्रापुर येथून चाकणकडे वळतील 
- पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने येरवडा, विश्रांतवाडी, आळंदी, चाकण शिक्रापुरमार्गे पुढे जातील किंवा खराडी बाह्यवळण मार्गे हडपसर पुणे सोलापुर रोडने केडगाव चौफुला मार्गे न्हावरा, शिरुर-नगर रोड अशी पुढे जातील 
-  सोलापुर रोडवरून थेऊर फाटा व 15 नंबर हडपसर येथून आळंदी, नगर, चाकण, लोणीकंद भागामध्ये जाणारी जड वाहने माल वाहतुक ट्रक/टेम्पो ही वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे येरवडा, विश्रांतवाडी, आळंदी, चाकण मार्गे पुढे जातील 
- आळंदी मार्गे नगरला जाणारी जड वाहने, माल वाहतुक ट्रक/टेम्पो ही वाहने मरकळ मार्गे शेल पिंपळगावमार्गे शिक्रापुर व सोलापुर बाजुकडे जाणारी ट्रक/टेम्पा अशी आळंदी येथून विश्रांतवाडी, येरवडा, खराडी बाह्यवळणमार्गे हडपसरच्या दिशेने जातील.
 

'या' कारणामुळेच भडकली कोरेगाव-भीमा दंगल!
 

No photo description available.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या संभाजी भिडेंची 'ही' आहे ओळख?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in traffic for Koregaon Bhima Vijay Stambh Greetings