कोरेगाव भीमा शौर्यदिन : पुणे - नगर महामार्गावरील वाहतूकीत बदल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

कोरेगाव भीमा नजिक पेरणेफाटा येथे दर वर्षी एक जानेवारी रोजी शौर्यदिन साजरा केला जात असताना देशभरातून लाखो अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात. दरम्यान, दरवर्षी कोरेगाव भीमा येथे होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी केला वाहतुकीत बदल आहे.

पुणे :  कोरेगाव भीमा शौर्यदिनानिमित्त ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे वळविण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे.

कोरेगाव भीमा नजिक पेरणेफाटा येथे दर वर्षी एक जानेवारी रोजी शौर्यदिन साजरा केला जात असताना देशभरातून लाखो अनुयायी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात. दरम्यान, दरवर्षी कोरेगाव भीमा येथे होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी केला वाहतुकीत बदल आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►
 क्लिक करा  

असा आहे वाहतूकीत बदल
नगर-पुणे महामार्गावर बेलवंडी फाट्याच्या पुढे वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक बेलवंडी फाटा, उक्कडगाव मार्गे नगर-दौंड रस्त्याने पाटसमार्गे पुणे-सोलापूर महामार्गाला वळविणार नगरहून जाणारी वाहने केडगाव बायपासपासूनच नगर-दौंड रोडने वळविण्यात येणार आहे.

Coronavirus : ब्रिटनहून पुण्यात आलेल्या 109 जणांचा शोध लागेना

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in traffic on Pune-Nagar highway