नाटकातून होतेय अक्षर ओळख

Drama
Drama

पुणे कॅन्टोन्मेंट - महाराष्ट्रामधील खेड्यापाड्यात आणि आदिवासी भागातील नागरिकांना नाट्यगृहात येऊन नाटक पाहता येत नाही, म्हणून टायनी टेल्स या संस्थेने ग्रामीण भागात जाऊन नाटक घेऊन जाण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्या माध्यातून मुलांसमोर पुस्तकांचं, अक्षरांचं जग खुल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत 54 हजार लोकांपर्यंत नाटक पोहोचविण्यात यशस्वी झाल्याचे संस्थेने म्हटले आहे.टायनी टेल्स ही संस्था मागील तीन वर्षांपासून पुस्तकं, गोष्टी नाटकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत, त्यांच्या जागेत गावागावात फिरून नाटक पोहोचवण्याचे काम करीत आहे. ते स्वतः तुम्ही बोलवलं त्या ठिकाणी येऊन नाटक करतात. त्यांच्या या नाटकाला स्टेज, लाईट्स, मोठ्या जागा असं काही लागतच असं नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एखाद्या झाडाखाली, अंगणात, शाळेच्या वर्गात असं कुठेही हे नाटक उभं राहू शकतं. आम्ही नाटक घेऊन जेव्हा गावागावात फिरतो तेव्हा ही गावं खूप आतमध्ये असतात, तिथेपर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य असतं. अनेक गावात जाण्यासाठी प्रवासाच्या सोयीसुविधा नाहीत, रस्ते, वीज आदी मुलभूत सुविधासुद्धा नाहीत, अशी परिस्थिती आहे. पायी, डोंगरदऱ्या पार करत ट्रॅक्टर, बैलगाडी अगदी मिळेल त्या वाहनांनी गावापर्यंत पोहोचलोय. नाटक बघायला मग शेतात काम करून थकलेल्या ताया, खेळणारी पोरं, आजी-आजोबा, लाकडं घेऊन जाणारे दादा, गरीब-श्रीमंत, लहान-मोठे, सगळे एकत्र बसतात, ही बाब आमच्यासाठी महत्त्वाची आहे.

मागील अनेक महिने करोनामुळे बंद असलेल्या नाट्यप्रयोगांना आम्ही पुन्हा सुरू करत आहोत, असे टायनी टेल्स निर्मित, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र व सर्जनशाळा, कोल्हापूर प्रस्तुत 'आलोर गान' या नाटकाने.  'आलोर गान' हे एका मूळ बंगाली लोककथेवर आधारलेलं नाटक आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली, एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगितलेली ही 'सुंदरबनाची' लोककथा 'संध्या राव' यांनी लिखित स्वरूपातून जतन करून ठेवली आहे. या कथेचे नाट्यरूपांतरण आणि दिग्दर्शन प्रतिक्षा खासनीस यांनी केले आहे.

साधारणपणे ५० मिनीटांच्या या प्रयोगात विविध भागातलं लोकसंगीत, लोकवाद्यही वापरली आहेत.  महाराष्ट्रातील तमाशा, तसेच बंगालमधीलही काही लोककलाप्रकारांचा समावेश यामध्ये केला आहे. बंगालमधील ही सर्वात जुनी लोककथा असुन, या लोककथेत निसर्ग, माणूस, धर्म अशा कितीतरी गोष्टींचे दडलेले संदर्भ सापडतात. या गोष्टीत इंटर रिलिजन हार्मोनीचे अनेक नकळतपणे आलेले संदर्भही आहेत. या नाटकाचे संगीत ऋषिकेश देशमाने यांनी केले होते. शिवाय संगीत सहाय्यक महेंद्र वाळूंज आणि शुभम कुंभार, वेषभूषा प्राजक्ता कवळेकर, वेषभूषा सहाय्यक मधुरीका महामुनी आणि रंगभूषा मिताली गाठे यांनी केली होती. याचा प्रयोग दिनांक २८ फेब्रुवारी रोजी, सायंकाळी ७ वाजता अंगणमंच, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, पुणे येथे तसेच दुसरा प्रयोग, दिनांक १ मार्च रोजी, सायंकाळी ७ वाजता, एस.एम.जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे.या नाटकाचा कालावधी १ तास असेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com