साई उद्यानावरून आरोप-प्रत्यारोप 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

पिंपरी - शहरातील गोर-गरीब नागरिकांची अनधिकृत बांधकामे महापालिका तत्परतेने पाडते. मात्र, महापालिकेनेच साई उद्यानामध्ये केलेले अनधिकृत पाडत नाही. उद्यानातील अनधिकृत बांधकाम पाडाश्री अन्यथा शहरातील एकही अनधिकृत बांधकाम पाडू देणार नाही, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नगरसेवक दत्ता साने यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी (ता. 28) महापालिका सभेत घेतली. या बांधकामावरून विरोधक व सत्ताधाऱ्यांनी आरोप-प्रत्यारोप करत गोंधळ घातला. 

दत्ता साने यांनी पालिका हद्दीतील उद्यानांच्या अनधिकृत बांधकामांबाबत प्रश्‍न विचारला होता. याबाबत बोलताना साने म्हणाले, ""महापालिकेच्या वतीने गोर-गरिबांची घरे अनधिकृत म्हणून त्वरित पाडली जातात. पालिकेच्या वतीनेच साई उद्यानात अनधिकृत बांधकाम केले. सर्वसामान्यांना एक न्याय व स्वतःच्या बांधकामाला वेगळा न्याय का, अगोदर साई उद्यानातील अनधिकृत बांधकाम पाडा नाहीतर शहरातील एकही अनधिकृत बांधकाम पाडू देणार नाही.'' शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला, तर त्याला महापालिका जबाबदार असेल, असा इशाराही साने यांनी प्रशासनाला दिला. 

शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे म्हणाल्या, ""पक्षनेत्या मंगला कदम यांच्या प्रभागातील साई उद्यानात अनधिकृत बांधकाम केले जात आहे. या बांधकामाला एमआयडीसीसह हरित लवादाची परवानगी नाही. हे अनधिकृत बांधकाम करून देण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा हात आहे.,'' 

उबाळे यांनी आपले बोलून झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून खुलासा मागितला. शमीम पठाण व मंगला कदम यांनीही बोलण्याची मागणी केली. उबाळे यांनी खुलासा देण्याची मागणी लावून धरली. खुलासा होत नसल्याचे पाहून उबाळेंनी गणसंख्येचा मुद्दा उपस्थित करत सभा तहकूब करण्याची मागणी केली. इच्छा नसतानाही गणसंख्येअभावी सत्ताधारी राष्ट्रवादीला सभा तहकूब करावी लागली. 

महापौरच राष्ट्रवादीला अडचणीत आणतात, याबाबत बोलताना मंगला कदम म्हणाल्या, ""महापालिकेचा कार्यकाल पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा कालावधी राहिला असल्याने महापौरबदल करता येत नाही. त्या आरक्षणातील महापौर असल्याने त्यांना सांभाळून घ्यावे लागते; तसेच दत्ता साने यांना नागरिकांना सुविधा देण्यासाठी आपल्या प्रभागातील आरक्षणाची जागाही ताब्यात घेता येत नाही. यामुळे त्यांनी आरक्षणातील बांधकामाबाबत काय बोलावे? उबाळे यांनी प्रथम तहकुबीची मागणी करून स्वतः बोलून आमच्यावर आरोप केले. मात्र आमची बोलायची वेळ आल्यावर पुन्हा गणसंख्येचा मुद्दा उपस्थित करून सभा तहकूब करायला लावली. हा रडीचा खेळ आहे.'' 

Web Title: Charges from Sai park