विनयभंगाच्या गुन्हयात अवघ्या पाच तासात आरोपपत्र दाखल

The chargesheet filed in five hours in the case of molestation
The chargesheet filed in five hours in the case of molestation

पिंपरी, (पुणे) - एका 65 वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना दिघी येथे घडली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासात पोलिसांनी आरोपीला अटक करीत आरोपपत्रही दाखल केले. ही घटना आज (ता.27) सकाळी घडली आहे.

महादेव एकनाथ गोरे (वय 65, सैनिकनगर, पतसंस्थेजवळ, माऊली वाळकेवाडा, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गोरे याच्या दोन मुली शाळेत गेल्या होत्या तर पत्नी कामाला गेली होती. त्यावेळी शाळेत जाण्याच्या तयारीत असलेल्या ओळखीच्या 13 वर्षीय मुलीला सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरोपीने नाश्‍ता देण्यासाठी स्वतःच्या घरात बोलविले.

त्यानंतर तिचा विनयभंग केला. याबाबत दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासात पोलिस उपनिरीक्षक मनीषा दशवंत, सहायक उपनिरीक्षक ननावरे, पोलिस कर्मचारी सुनील गवारी, प्रदीप वाशाळे यांच्या पथकाने आरोपीला अटक करीत आरोपपत्रासह शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दिघी पोलिसांनी अगदी कमी वेळेत कौशल्यपूर्ण तपास करीत अवघ्या पाच तासात आरोपपत्र दाखल केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com