अखेर चास-कमान धरणशंभर टक्के भरले! पाचही वक्र दारे उघडले

राजेंद्र लोथे
Sunday, 30 August 2020

कालवा आणि नदी मिळून 1775 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक अभियंता प्रेमचंद शिंदे तसेच शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे.

चास : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात गेली काही दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असून रविवार (ता. 30) चास कमान धरणाचा पाणीसाठा 100 टक्यांवर (8.53 टीएमसी) पोहचला. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून 925 क्युसेक्स वेगाने पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

Rainfall : गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद!

Image may contain: outdoor and water
कालवा आणि नदी मिळून 1775 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक अभियंता प्रेमचंद शिंदे तसेच शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे.

Image may contain: sky, outdoor and waterधरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेली काही दिवसांपासून संततधार पाऊस असून धरणातील पाणीसाठा शंभर टक्के झाला असून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने वेगाने पाणीसाठ्यात वाढ झाली. ऑगस्ट महिना संपत आल्याने धरणात शंभर टक्के पाणीसाठा गरजेचा असल्याने आज पाणीसाठा शंभर टक्के झाल्यावरच धरणाची पाचही वक्र दारे उघडून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या खात्यात आठवडाभरात पैसे जमा होणार; धनंजय मुंडे यांची घोषणा​

Image may contain: outdoor and water
धरण शंभर टक्यांच्यावर गेल्याने धरणाचे पाचही दरवाजे रविवारी सकाळी 10 वाजता उघडण्यात आले. धरणाचा पाणीसाठा शनिवारी 98.39 टक्यांवर पोहोचल्यावर सकाळी 8.30 वाजता विद्यूत विमोचकाव्दारे कालव्यात 450 व अतिवाहिणीद्वारे नदीपात्रात 400 कूसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला होता त्यामुळे वीजनिर्मीतीनंतर 450 क्युसेक्स कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. आज धरणातून एकूण 1775 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग असून आवक 2850 क्युसेक्स आहे.

Image may contain: bridge, outdoor and water

मागील वर्षी 28 जुलैला धरणात 98.13 टक्के पाणीसाठा झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात येवून 5510 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत करण्यात आला होता यावर्षी मात्र तब्बल एक महिना दोन दिवस उशीराने म्हणजेच 30 ऑगस्टला 100 टक्यांवर पाणीसाठा गेल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात येवून 925 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Image may contain: outdoor and water

भरल्याने पाण्याच्या पातळीवर चोवीस तास धरण कर्मचारी भिवसेन गुंडाळ, बाबाजी कडलग, बाळासाहेब आनंदकर, ज्ञानेश्र्वर हुले, ज्ञानेश्र्वर कदम, सुधाकर तनपुरे, शांताराम नाईकडे, दत्ता नवले, विठ्ठल नाईकडे, सुरेश गुंडाळ व रोहिदास तनपुरे, उद्धव नाईकडे, तुळशीराम नाईकडे लक्ष ठेवून आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chas Kaman dam is 100 percent full and All five curved doors opened