चासकमान धरणाच्या कालवा गळतीने ओढे-नाले वाहताहेत खळखळून

राजेंद्र लोथे
बुधवार, 16 मे 2018

चास : चासकमान धरणातून सुमारे 54 दिवसांपासून कालव्यातून आवर्तन सुरू असून, कालव्याचे अस्तरीकरण रखडल्याने कालव्याला मोठ्या प्रमाणात गळती असल्याने पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कालवा गळतीचे पाणी पाझरून शेजारच्या शेतांमध्ये येत असल्याने शेतीही नापीक झाली आहे.

विशेष बाब म्हणजे कालवा अस्तरीकरण गरजेचे असताना व कालवा गळतीने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असताना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवीनच जावई शोध लावला असून 'टेल टू, हेड' पाणी वितरण होत असताना खेड तालुक्यातील शेतकरी शेतीसाठी पाणी उपसतात. त्यामुळे योग्य दाबाने पाणी टेलकडे पोहचत नाही. म्हणून विजेच्या पंपाची वीज कनेक्शन बंद करत शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. मात्र, कालवा गळतीने चास व परिसरातील ओढे नाले खळखळून वाहत असून धबधब्याप्रमाणे पाणी कोसळत असल्याने डोळ्यांना सुखद गारवा मिळतो आहे.

Web Title: Chasakaman dam water Flowing