चासकमानचे पाणी पिण्यास राखीव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

चास - खेड तालुक्‍यातील चासकमान धरणात आजअखेर ७.११ टक्के म्हणजेच १.५० टीएमसी एकूण पाणीसाठा आहे. यात ०.५४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजअखेर ५.६६ टक्के म्हणजेच ०.४२ टीएमसी साठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १.४५ टक्के जादा पाणी आहे. धरणातील सर्व पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 

खेडसह शिरूर तालुक्‍याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान धरणातून उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात आलेले आवर्तन २९ मे रोजी बंद करण्यात आले. आवर्तनानंतर शिल्लक पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांची पाण्याची सोय होणार आहे. धरण परिसरात एक जूनपासून ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. प्रकल्पातून गेल्या वर्षभरात खरीप हंगामासाठी एक, रब्बीसाठी दोन, तर उन्हाळी हंगामासाठी दोन, अशी पाच आवर्तने सोडण्यात आली आहेत.
- उत्तम राऊत, शाखा अभियंता  

Web Title: chaskaman water reserved for drinking