पाइपच्या साह्याने सोडले कालव्यात पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

चास - चासकमान धरणाच्या कालव्याच्या दरवाजाचे विद्युतीकरण रखडले आहे. हाताने फिरवण्याचे गेटचे चाक काढून टाकल्याने कर्मचाऱ्यांना गेटच्या चाकामध्ये पाइप घालून महत्प्रयासाने शिरूरसाठी कालव्यात पाणी सोडावे लागले. त्यामुळे पावसाळ्यात धरणातील पाणी कालव्यात सोडण्याची वेळ आल्यास पाण्याच्या प्रचंड दाबामुळे गेट उघडणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

चासकमान धरणातून कालव्याला पाणी सोडण्यासाठी दरवाजे असून, लोखंडी चाक हाताने फिरवून उघडावे लागतात. सदर गेट स्वयंचलित करण्याची मागणी होत होती. जवळपास वीस वर्षांनी विद्युत मोटर बसविण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली व एप्रिल २०१८ मध्ये कामही सुरू झाले. त्यासाठी या गेटच्या चाकांना वरच्या बाजूस विद्युत मोटर बसविण्यात आल्या तसेच गेटसाठी असलेली लोखंडी चाकेही काढून टाकण्यात आली व लवकरच ही स्वयंचलित यंत्रणा सुरू होईल, असे वाटत असताना काम बंद झाले. काढलेली लोखंडी चाके व खोलून ठेवलेली लोखंडी चाके धरण स्थळावर पडलेली आहेत.

 शिरूर तालुक्‍याची पाण्याची गरज पाहता कालव्यातून पाणी सोडण्यासाठी या गेटची व गेटच्या चाकाची गरज असताना फिरविण्यासाठी चाकच नसल्याने कर्मचाऱ्यांनी सुमारे अर्धा ते पाऊण तासाच्या अथक प्रयत्नानंतर गेटच्या वरील व्हीलमध्ये पाइप घालून पाणी सोडले. सध्या धरणात केवळ ७.३० टक्के पाणीसाठा असल्याने गेटचे चाक फिरवण्यास तसे सोपे गेले. परंतु, पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर व कालव्यातून पाणी सोडण्याची गरज भासल्यास पाण्याच्या दाबामुळे पाइपच्या साह्याने गेट उघडणे शक्‍य होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरवाजांचे विद्युतीकरण करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Chasmman Dam Water on the canal left by the pipes