चव्हाण आणि पाटील यांच्याकडून अरुणा ढेरे यांना शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

कऱ्हाड : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी एकत्र येत पुणे येथे त्यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. अरुणा ढेरे यांच्या पुणे येथील निवासस्थानी चव्हाण व पाटील यांनी जावून त्यांचा सत्कार केला.

त्यांच्या कार्याचे कौतुकदेखील केले. त्यांच्यासोबत माजी आमदार उल्हास पवार, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आबा बागुल उपस्थित होते. यावेळी पुष्पगुच्छ देवून चव्हाण व पाटील दोघांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर तेथे साहित्य क्षेत्रातील प्रत्येकाचा व्यासंग यासह विविध चर्चाही रंगल्या.

माजी आमदार उल्हास पवार यांच्याकडे चर्चेचा सूर आल्यानंतर सर्वांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. अरुणा ढेरे यांच्या रुपाने प्रख्यात साहित्यिकास अध्यक्षपदाचा मान मिळाला अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: Chavan and Patil congratulates Aruna Dhere