स्वस्त फ्लॅटला भुलले 44 जण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सासवड - दिवे (ता. पुरंदर) येथे स्वस्तात फ्लॅट देतो, अशी जाहिरात करून पुण्यातील ‘सुमेर लॅंड डेव्हलपर्स’कडून फसवणूक झालेल्यांची संख्या ४४ झाली आहे. अपहाराची रक्कम ४ कोटी ४४ लाखांच्या पुढे गेली आहे. या प्रकरणी बिल्डरसह एकूण १६ संशयित आरोपी असून, त्यातील काहींना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. 

सासवड - दिवे (ता. पुरंदर) येथे स्वस्तात फ्लॅट देतो, अशी जाहिरात करून पुण्यातील ‘सुमेर लॅंड डेव्हलपर्स’कडून फसवणूक झालेल्यांची संख्या ४४ झाली आहे. अपहाराची रक्कम ४ कोटी ४४ लाखांच्या पुढे गेली आहे. या प्रकरणी बिल्डरसह एकूण १६ संशयित आरोपी असून, त्यातील काहींना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. 

संशयित आरोपी व या प्रकल्पाचे बिल्डर संतोष दत्तात्रेय सपकाळ (रा. कोरेगाव पार्क, पुणे) हे असून त्यांच्यासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील पहिली फिर्याद निशा बालाजी कोटगिरे (रा. दत्तनगर, कात्रज, पुणे) यांनी सासवड पोलिसांत दिली होती. त्याची शहानिशा करूनच ‘सुमेर लॅंड डेव्हलपर्स’विरुद्ध मागील महिन्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे फसवणूक प्रकरण उघडकीस आले. त्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रारी वाढल्या. आतापर्यंत ४४ जणांनी ४ कोटी ४४ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणात किमान ९० लोकांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सासवडचे पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, हवालदार राजेश पोळ, अजित माने तपास करीत आहेत. फसवणूक झालेल्यांनी सासवड पोलिसांकडे (०२११५- २२२३३३) तक्रार द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, या प्रकरणात ‘सुमेर लॅंड डेव्हलपर्स’चे संतोष सपकाळ हे प्रमुख संशयित आरोपी आहेत. त्यांना पंकज अमृतलाल नवलाखा (रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी स्वतःची १०० गुंठे जमीन विकसित करून ६०-४० प्रमाणात इमारत उभारण्यास दिली होती. सपकाळ यांचे ३४.५ गुंठे प्रकल्पात क्षेत्र आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

या प्रकल्पात सपकाळ यांचे संशयास्पद व्यवहार वाटल्याने प्रकल्पातील फ्लॅटच्या व्यवहारांचे दस्त करू नयेत, याबाबत पुरंदरचे तहसीलदार व दुय्यम निबंधक यांना १ एप्रिल २०१७ रोजी पत्र देऊन लक्ष वेधले होते. पोलिसांकडेही त्याचवेळी २५ एप्रिलला जागा मालक या नात्याने अर्ज दिला होता. त्या बाबींच्या नक्कल व इतर कागदपत्रे, माझे म्हणणे मी नुकतेच पोलिसांना सादर केले.
- पंकज नवलाखा, जागा मालक

Web Title: cheap flat cheating crime