सर्वात स्वस्त कोरोना निदान संच येणार बाजारात 

सर्वात स्वस्त कोरोना निदान संच येणार बाजारात 

पुणे - सर्वांत स्वस्त कोरोना निदान संच खडगपुर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) विकसित केला असून, तो लवकरच बाजारात येणार आहे. कारण आयआयटीच्या "कोव्हिरॅप' या निदान संचाला भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) नुकतीच मान्यता दिली आहे. 

रेण्वीय निदान पद्धतीचा वापर करत, शास्त्रज्ञांनी सहज हाताळण्या जोगे (पोर्टेबल) संयंत्र विकसित केले आहे. विशेष म्हणजे या संयंत्राची किंमतही अत्यंत कमी असून, सध्या एका निदान चाचणीसाठी 500 रुपयांचा खर्च येतो. औद्योगिक उत्पादन झाल्यास निदान चाचणीची किंमत कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आयआयटी खडगपुरचे संचालक प्रा. व्ही. के. तिवारी यांनी सांगितले. कोरोनाचे निदान करण्यासाठी सर्वांत स्वस्त आणि अचूक निदान संच विकसित करत आयआयटीच्या संशोधकांनी आत्मनिर्भर भारतामध्ये मोठे योगदान दिले आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल "निशंक' यांनी दिली. प्रा. सुमन चक्रवर्ती, डॉ. अरिंदम मोंडल यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या चमूने हा संच विकसित केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे होते निदान ः 
- रेण्वीय निदान पद्धतीचा वापर 
- घशातील किंवा नाकातील द्रव पदार्थाचा (स्वॅब) नमुना म्हणून वापर 
- रसायनांमध्ये स्वॅब बुडविल्यानंतर त्याला जैवनिर्देशक पट्टीवर ठेवण्यात येते 
- संबंधित पट्टी संचामध्ये क्रेडिट कार्डप्रमाणे घालण्यात येते 
- त्यानंतर स्मार्ट फोन्सच्या माध्यमातून फोटो काढण्यात येतो 
- मोबाईलमधील सॉफ्टवेअर फोटोच्या आधारे कोरोनाचे अचूक निदान करते 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोव्हिरॅपची वैशिष्ट्ये ः 
- संयंत्राची किंमत सर्वांत स्वस्त 
- फक्त 500 रुपयात निदान 
- कोरोनाचे अचूक आणि विश्‍वासार्ह निदान एका तासात 
- नुकतीच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचेही निदान शक्‍य 
- कौशल्य नसलेल्या व्यक्तीकडून निदानाची प्रक्रिया सहज पूर्ण 
- भविष्यात इतरही संसर्गजन्य आजारांचे निदान करता येणार 
- ग्रामीण आणि दुर्गम भागातही निदानाची व्याप्ती वाढवता येईल 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आम्ही पेटंट केलेले हे संयंत्र रुग्णांचे अचूक निदान करण्यासाठी सक्षम ठरले आहे. केवळ कोरोनोचेच नाही तर "आयसोथर्मल न्युक्‍लिक ऍसिड' प्रकारातील म्हणजेच डेंगी, संसर्गजन्य आजार, हिवताप, क्षयरोग आदींचे निदानही स्वस्त आणि अचूक पद्धतीने करणे शक्‍य होणार आहे. 
- प्रा. सुमन चक्रवर्ती, यांत्रिक अभियांत्रिकी, आयआयटी, खडगपूर. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com