पुणे : तिकीट बुकिंग करणाऱ्या एजन्सीला कोट्यवधींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

2015 मध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करुनही पैसे न दिल्यामुळे अखेर याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे : तिकीट बुकिंग करणाऱ्या एजन्सीला लंडनमधील कंपनीकडुन तब्बल 1 कोटी 43 लाख 53 हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे.

विमान कंपन्याचे तिकीट बुकिंग करणाऱ्या पुण्यातील ओडीसी टूर्स अँण्ड ट्रॅव्हल्स या एजन्सीचा विश्वास संपादन करुन लंडनच्या जॉन स्टील, ए.शुलमन आयएनसी लिमिटेड या कंपनीसह काही नागरिकांनी 1 कोटी 43 लाख 53 हजार रुपये इतक्या किमतीची तब्बल 98 आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाची तिकीटे बुकिंग केली. त्यानंतर त्या तिकीटांवर प्रवासही करण्यात आला. त्यानंतरही पैसे एजन्सीला पैसे देण्यात आले नाहीत.

2015 मध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करुनही पैसे न दिल्यामुळे अखेर याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: cheated for ticket booking company in Pune

टॅग्स