यवत परिसरात कोट्यवधींचा गंडा

यवत (ता. दौंड) - पोलिस स्टेशनच्या आवारात पीडित महिलांशी चर्चा करताना कार्यकर्ते.
यवत (ता. दौंड) - पोलिस स्टेशनच्या आवारात पीडित महिलांशी चर्चा करताना कार्यकर्ते.

यवत - एका बनावट कंपनीने पाच वर्षांत दाम दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार यवत (ता. दौंड) येथे समोर आला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये शेतकरी, शेतमजूर, गृहिणी, कामगार महिलांचा प्रामुख्याने समावेश आहे. हा फसवणुकीचा प्रकार मागील सुमारे आठ वर्षांपासून सुरू आहे. 

या फसवणुकीबाबत यवत येथील महिलांनी जिल्हा परिषद सदस्य गणेश दोरगे, शिवसेना शाखा प्रमुख अशोक दोरगे, श्रीपती दोरगे, काँग्रेसचे अरविंद दोरगे, मोहसीन तांबोळी, नामदेव दोरगे, भाजपचे अविनाश अवचट यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या सर्व महिलांसह या कार्यकर्त्यांनी यवत पोलिसांकडे धाव घेतली आहे.

झारखंड येथील ही मूळ कंपनी असून, तिचे संपर्क कार्यालय चिंचवड (पुणे) येथे असल्याचे सांगण्यात येते. या कंपनीने काही स्थानिक एजंटना हाताशी धरून येथे हातपाय पसरले. कमिशनच्या आशेने येथील स्थानिक एजंटने परिसरातील शेकडो महिलांना भुरळ घातली. पाच वर्षांत दाम दुप्पट रक्कम मिळेल, या आमिषाने दरमहा हप्त्याने पैसे भरणे, पान २ वर 

पदाधिकाऱ्याची पत्नीही गळाला...
यवत येथील एका राजकीय पदाधिकाऱ्याची पत्नीही या कंपनीच्या गळाला लागली होती. मात्र, हा प्रकार संबंधित पदाधिकाऱ्याच्या लक्षात येताच त्याने पुढील रक्कम भरण्यापासून आपल्या पत्नीस परावृत्त केले. त्यामुळे त्यांच्यापुरते हे प्रकरण एक-दोन हप्त्यांवरच थांबले. 

या प्रकाराबाबत रीतसर तक्रार द्या. त्याचा योग्य मार्गाने तपास करून शक्‍य असेल, ती सर्व कायदेशीर कारवाई केली जाईल.
- सूरज बंडगर, पोलिस निरीक्षक, यवत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com