परदेशातील नोकरीच्या आमिषाने फसवणूक

Crime
Crime

पुणे - इराणमधील अबादान येथे चांगल्या पगाराची नोकरी लावतो, असे आमिष दाखवून दोघांनी तरुण अभियंत्याची तब्बल ४ लाख ३१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. संबंधित तरुण इराण येथे गेला, मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मायदेशी परत येऊन नवी मुंबईतील महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

जयेश हिरेमठ (वय ३४, रा. सातवनगर, हांडेवाडी रस्ता) असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव असून, त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीचा प्रकार २६ जून ते ४ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरेमठ हे सातवनगर येथे राहतात. नवी मुंबईतील उरण येथे राहणारी एक महिला व एका पुरुषाने हिरेमठ यांच्या घरी येऊन त्यांना अबादान येथे ९०० ते ११०० डॉलर एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी प्रारंभी त्यांच्याकडून ५० हजार रुपये त्यांनी घेतले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून टप्प्याटप्प्याने ४ लाख ३१ हजार रुपये घेतले. हिरेमठ इराणला जाण्यासाठी निघाले होते. तेव्हा ऐनवेळी ७०० डॉलर एवढ्या पगाराचे पत्र मिळेल असे सांगण्यात आले. तसेच जबरदस्तीने ते त्यांच्या जबाबदारीवर परदेशात नोकरीस जात असल्याचे लिहून घेतले. हिरेमठ अबादान येथे गेल्यानंतर नोकरीबाबतचे पत्र मिळाले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आर. डी. गायकवाड करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com