सोन्याच्या आमिषातून ३३ लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

तळेगाव दाभाडे - कमी पैशांमध्ये सोने देण्याचे आमिष दाखवून ३३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच यातील दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून यातील तिघांना अटक झाली आहे. 

तळेगाव दाभाडे - कमी पैशांमध्ये सोने देण्याचे आमिष दाखवून ३३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच यातील दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून यातील तिघांना अटक झाली आहे. 

याबाबत सोनाली जहांगीर बिस्वास (रा. नारायणगाव) यांनी तळेगाव पोलिसांत फिर्याद दिली. प्रकाश साळवे, आकाश साळवे, तेजस साळवे, मीनाक्षी साळवे, सिद्धार्थ साळवे, महेंद्र साळवे (सर्व रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तर आकाश व तेजस यांच्याविरुद्ध विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. यात प्रकाश साळवे, महेंद्र साळवे व सिद्धार्थ साळवे यांना अटक झाली. बिस्वास कुटुंब हे नारायणगावचे असून, जहांगीर हे तेथील लोळगे सुवर्णकार या सोन्याचांदीच्या दुकानात काम करतात. नारायणगाव येथील मित्र सागर व पुणे येथील एकाच्या ओळखीने तळेगाव येथील साळवे कुटुंबाकडून सहा लाख रुपयांत दहा तोळे वजनाची सोन्याची दोन बिस्किस्टांची दोन वेळा खरेदी केली. नंतर प्रकाश साळवे यांनी जहांगीरला दीड किलो सोने ३३ लाख रुपयांमध्ये देतो असे सांगितले. जहांगीर यांनी ३३ लाख उसनवार घेऊन तळेगाव गाठले. मात्र, साळवे कुटुंबाने त्यांच्याकडील पैसे काढून घेतले. मात्र, सोने घरी ठेवलेले नाही असे सांगून दुसऱ्या दिवशी देतो अशी बतावणी केली. वारंवार चौकशी करूनही सोने मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे जहांगीर यांच्या लक्षात आले. त्यामुळे जहांगीर यांनी रकमेची मागणी केली असता साळवे कुटुंबीयांनी धमकावून पैसे देण्यास नकार दिला. या वेळी आकाश व तेजस यांनी सोनाली यांचा विनयभंग केला.

Web Title: Cheating Crime