डॉक्‍टर असल्याचे सांगत तरुणीची साडेचार लाखांची फसवणूक

Crime-Scene
Crime-Scene

पुणे - विवाहविषयक संकेतस्थळावरून तरुणीशी ओळख वाढवून लंडन येथे डॉक्‍टर असल्याची बतावणी करत एकाने तरुणीची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवणे येथील 28 वर्षीय तरुणीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणीही ही स्पर्धा परीक्षेची तयारी करते. आई-वडिलांनी सांगितल्यानुसार, तरुणीने लग्नासाठी शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर स्वतःचे प्रोफाइल तयार केले होते. दरम्यान, ऑगस्ट 2018 मध्ये तरुणी संबंधित संकेतस्थळावरून संजय गुप्ता नावाच्या तरुणाने संपर्क साधत ओळख वाढविली. आपण लंडनमध्ये डॉक्‍टर असल्याची बतावणी करून तरुणीचा विश्‍वास संपादन केला.

दरम्यान, संबंधित व्यक्तीने तरुणीला तिच्यासाठी लंडनहून पार्सल पाठविल्याचे सांगितले. संबंधित पार्सल दिल्ली विमानतळावर अधिकाऱ्यांनी अडविले आहे. तरुणीला ते पार्सल सोडवून घेण्यासाठी प्रारंभी 25 हजार रुपये एका बॅंक खात्यात भरायला सांगितले. त्यानंतर संबंधित पार्सलमध्ये 35 हजार डॉलर आहेत. डॉलरचे भारतीय चलनामध्ये बदल करून घेण्याबरोबरच वेगवेगळी कारणे सांगत चार लाख 26 हजार रुपये भरायला सांगितले. त्यानुसार तरुणीने रक्कम भरली. त्यानंतर संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com