मुंबईत नोकरीचे आमिष दाखवून चार तरुणांची फसवणूक

fraud2.jpg
fraud2.jpg

पुणे ः मुंबईमधील एका नामांकीत महाविद्यालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार तरुणांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी महेश कदम (वय 30, रा. कोयना वसाहत, गोरेगाव, मुंबई) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मधुकर दादू साळवे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची काही महिन्यांपुर्वी साळवेसमवेत ओळख झाली होती. फिर्यादी हे मुंबईतील रहिवासी आहेत. त्यामुळे साळवे याने मुंबईतील एका नामांकीत महाविद्यालयामध्ये तुम्हाला नोकरी लावून देतो, असे सांगितले.

दरम्यान, मागील महिन्यात फिर्यादी व साळवे यांची भांडारकर रस्त्यावर भेट झाली. त्यावेळी साळवेने पुन्हा एकदा फिर्यादी यांना नोकरीचे आमिष दाखविले. तसेच त्यांच्या तीन नातेवाईकांनाही नोकरीस लावू असे सांगितले. त्यासाठी त्याने फिर्यादसह चौघांकडून प्रत्येकी साठ हजार रुपये असे एकूण दोन लाख 40 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर फिर्यादी यांनी साळवेशी संपर्क साधला. मात्र त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच फिर्यादी यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com