आजारी आईची दहा कोटींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मार्च 2019

आजारी आईची दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिच्या दोन मुलींसह बॅंक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून तपास करावा, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांनी दिला.

पुणे - आजारी आईची दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिच्या दोन मुलींसह बॅंक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून तपास करावा, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांनी दिला.

जेनोबिया रुसी पटेल (वय ८५, रा. कॅंटोन्मेंट, पुणे) यांनी याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. झुबिन विवियन डिसूझा ऊर्फ झुबिन रुसी पटेल (मुलगी), रोमिना परवेझ खंबाटा (मुलगी), परवेझ तालिब खंबाटा, योहान खंबाटा, क्रिस्टोफर लोझोडो, जसजीत सिंह निज्जर, सतीश सबनीस यांनी बॅंक ऑफ इंडिया आणि कॉसमॉस बॅंकेतील व्यवस्थापक, अधिकारी आणि अन्य आरोपीशी संगनमत करून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाची माहिती ॲड. आशुतोष श्रीवास्तव यांनी दिली. जमिनीच्या विक्रीतून मिळालेली रक्कम फिर्यादी यांनी पती रुसी पटेल हयात असताना संयुक्त खात्यात, शेअर्स, म्युच्युअल फंड, ठेवींच्या स्वरूपात ठेवली होती. फिर्यादी आजारी होत्या. त्यावेळी त्यांची फसवणूक करण्यात आली.

Web Title: Cheating to mother by daughter