एकच जमीन अनेकांना विकुन केली फसवणूक

सचिन निकम
रविवार, 27 मे 2018

एकच जमीन अनेकांना विकुन फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा हडपसर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी या दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.

हडपसर(पुणे) - एकच जमीन अनेकांना विकुन फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात फसवणुकीचा गुन्हा हडपसर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी या दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. सुंदराबाई महादू बाठे व पुष्पां काळूराम साकोरे (दोघे राहणार फुरसुंगी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत सतीश भानुदास शेळके (वय ४६ रा.फुरसुंगी ) यांनी फिर्याद दिली आहे. 

हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाठे व साकोरे यांनी शेळके यांना २००४ साली १६ लाखात जमिन विकली होती. त्यावेळी १४ लाख देऊन साठेखत केले होते. बाकीची रक्कम खरेदीखत करते वेळी देऊन व्यवहार पूर्ण करावयाचा होता. मात्र नंतर बाठे व साकोरे यांनी खरेदीखत करण्याबाबत टाळाटाळ केली. बाठे व साकोरे यांनी परस्पर तिसऱ्या ग्राहकाला जमीन विकली. हे लक्षात आल्यावर शेळके यांनी पैश्याची मागणी केली. मात्र त्यांनी १४ लाख रुपये ही देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शेळके यांनी बाठे व साकोरे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Cheating in selling land