मेसेजच्या माध्यमातून फसवणूक

मेसेजच्या माध्यमातून फसवणूक

पुणे - तुमची मैत्रीण प्रियांका हिने तुम्हाला एक हजार रुपये ऑनलाइन पाठविले आहेत. ही रक्कम घेण्यासाठी p4I18p  हा कोड वापरा. त्यासाठी संबंधित लिंकवर क्‍लिक करा किंवा ॲप डाउनलोड करा... असे असंख्य मेसेज नागरिकांच्या मोबाईलवर येत आहेत. मात्र, त्याद्वारे तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे त्यास प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मागील आठवड्यापासून शहरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर दिवसातून पाच-दहा वेळा या स्वरूपाचे मेसेज येत आहेत. त्यासंदर्भात काही सजग नागरिकांनी तत्काळ पोलिसांनी माहिती दिली. संबंधित मेसेजमध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावाने एक हजार रुपये ऑनलाइन मिळत असल्याचा दावा केला आहे. ही रक्कम मिळविण्यासाठी ठराविक लिंक किंवा ॲपचा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण असे मेसेज पाहण्याचा प्रयत्न करतात. 

शहरातील अनेक नागरिक अशा मेसेजमुळे त्रस्त झाले असून हा प्रकार नेमका काय आहे, याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच अशा  फसवणुकीबाबत कोणाकडे तक्रार करायची, याबाबतदेखील नागरिकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण  झाले आहे. 

मोबाईल क्रमांक पोचतात कसे? 
मेसेज पाठविणाऱ्यांकडे सर्वसामान्य नागरिकांचे वैयक्तिक संपर्क क्रमांक जातात कसे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र ऑनलाइन खरेदी, हॉटेलिंग, ऑनलाइन व्यवहार, पेट्रोल पंप व मॉल्स या ठिकाणी ‘फिडबॅक फार्म’च्या बहाण्याने नागरिक आपली वैयक्तिक माहिती देतात. ही महिती परस्पर मिळवून हा प्रकार केला जात असण्याची शक्‍यता आहे. 

नागरिकांना फसवणूक करणारे मेसेज येण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे. त्याद्वारे त्यांचा डेटा चोरून आर्थिक फसवणूक होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे नागरिकांनी अशा मेसेजला प्रतिसाद देऊ नये.
- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

ही काळजी घ्यावी 
  मेसेजला प्रतिसाद देण्याचे टाळा
  मेसेजमधील लिंकवर क्‍लिक करू नका
  मेसेजमधील ॲप डाऊनलोड करू नका
  संबंधित मेसेज तत्काळ डिलीट करा
  अशा स्वरूपाचा मेसेज इतरांना फॉरवर्ड करू नका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com