फेसबुक मैत्री भोवली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

फेसबुकद्वारे महिलेशी पंधरा दिवसांमध्ये मैत्री वाढवून तिला महागडे गिफ्ट पाठविल्याचा बहाणा करून पाच लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्याला सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.

पुणे - फेसबुकद्वारे महिलेशी पंधरा दिवसांमध्ये मैत्री वाढवून तिला महागडे गिफ्ट पाठविल्याचा बहाणा करून पाच लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्याला सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.

जॉन वनरलअता (रा. नवी दिल्ली) असे संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिला खडकी येथे राहतात. त्यांच्याशी सप्टेंबर महिन्यान मारीओ जॉन्सन या बनावट नावाने आरोपीने फ्रेंडरिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री केली. त्याने महिलेस तिच्या वाढदिवसानिमित्त महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर महिलेला दुसऱ्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला, त्याने महिलेच्या नावाने पार्सल आले असून, ते प्राप्त करण्यासाठी काही रक्कम त्यांनी पाठविलेल्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेशी सातत्याने संपर्क ठेवून महिलेकडून पाच लाख रुपये उकळले. 

पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, सहायक निरीक्षक गंगाधर घावटे, कर्मचारी राजकुमार जाबा, दीपिका मोहिते, बाबासाहेब कराळे व शाहरूख शेख यांच्या पथकाने आरोपीला दिल्लीतून अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating on a woman via Facebook

टॅग्स