चेक क्‍लिअरिंगचे प्रमाण पन्नास ते साठ टक्‍क्‍यांवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पुणे  -खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन ट्रॅन्झॅक्‍शन्स्‌सहित प्लॅस्टिक मनीचा वाढलेला वापर, धनादेशाद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांत पन्नास ते साठ टक्‍क्‍यांपर्यंत झालेली वाढ आणि 1 जानेवारीनंतर नव्या चलनातच करावे लागणारे आर्थिक व्यवहार, यामुळे दैनंदिन परिस्थिती सुधारेल, असा विश्‍वास बहुतांश नागरिक आणि बॅंकिंग तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. पाचशे, हजारच्या जुन्या नोटा भरण्याचेही प्रमाण दहा टक्‍क्‍यांहूनही कमी झाले असून, नागरिकांच्या सोयीकरिता एटीएम केंद्रांवर पुरेशी रोकड उपलब्ध करून देण्यात येत असल्याचा दावा बॅंक अधिकारी करीत आहेत.

पाचशे, हजारच्या नोटांचा बॅंकेत भरणा करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (ता. 30) संपत आहे. 31 डिसेंबरपासूनच नव्या नोटांनी दैनंदिन व्यवहार करणे क्रमप्राप्त आहे. परंतु भारतीय रिझर्व्ह बॅंकेने करन्सी चेस्टकडे वेळेत अर्थपुरवठा केल्यास बॅंकांनाही नव्या वर्षांत पगारदार, निवृत्तिवेतनधारकांना अर्थपुरवठा करणे शक्‍य होऊ शकेल. या दृष्टीने बॅंकांकडूनही आरबीआयकडे पत्रव्यवहार होत आहे. बॅंकांतील नागरिकांची गर्दी कमी व्हावी, एटीएमवरूनच त्यांना पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठीच दोन हजार, पाचशे आणि शंभराच्या नोटांचा भरणा एटीएम केंद्रांवर करण्याकरिता बॅंकांकडून आरबीआय हमीपत्र भरून घेत आहे.

एक ते दहा जानेवारीदरम्यान नोकरदारांचे पगार आणि निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन देण्याकरिता करन्सी चेस्टकडून उपलब्ध रकमेचे नियोजन सध्या बॅंकांतर्फे करण्यात येत आहे.
दरम्यान, कॅशलेस व्यवहार वाढल्याने हळूहळू बॅंकांकडे आणि एटीएम केंद्रांवरील गर्दी ओसरेल, असा विश्‍वासही बॅंकिंग तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई येथील क्‍लिअरिंग विभागाचे मुख्य व्यवस्थापक अजय बर्वे म्हणाले, ""डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात धनादेशाद्वारे होणाऱ्या व्यवहारांची टक्केवारी 20 टक्‍क्‍यांपर्यंत होती. मात्र सद्य:स्थितीत हे प्रमाण पन्नास ते सत्तर टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. बहुतांश नागरिकांनीही वीजबिले धनादेशाद्वारे भरली आहेत. ऑनलाइन ट्रॅन्झॅक्‍शन्‌ (डेबिट, क्रेडिट कार्ड) व्यवहारांनाही प्राधान्य देण्याऱ्यांमुळे कॅशलेस व्यवहारांकडे होणारी वाटचाल चांगली आहे.''

बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे विभागाचे सहायक सरव्यवस्थापक निरंजन पुरोहित म्हणाले, ""बॅंकेच्या करन्सी चेस्टला या आठवड्यात 55 कोटी रुपये आले. पूर्वीच्या तुलनेत येणारी रोकड समाधानकारक आहे. त्यामुळे पुणे शहरातील बॅंकेच्या 68 एटीएम केंद्रांवर रोकडचा भरणा करण्यात आला आहे. महिन्याच्या सुरवातीला पगार आणि निवृत्तिवेतन देण्याचीही व्यवस्था बॅंकेतर्फे करण्यात येत असून, एटीएममधून अडीच हजारांचीच मर्यादा आहे. त्यामुळे आठवड्यातून कितीही वेळा पगारदार व निवृत्तिवेतनधारक पैसे काढू शकतील.''

Web Title: Check clearing rate of fifty to sixty per cent