भोरचे तहसिलदार अजितसिंह पाटील म्हणतात...

महेंद्र शिंदे
Wednesday, 16 September 2020

आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी आजाराची कोणतीही लक्षणे लपवून ठेवू नका. घरातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करून घ्या," असे आवाहन भोरचे तहसिलदार अजितसिंह पाटील यांनी नागरीकांना केले. 

खेड-शिवापूर : आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी आजाराची कोणतीही लक्षणे लपवून ठेवू नका. घरातील प्रत्येकाची आरोग्य तपासणी करून घ्या," असे आवाहन भोरचे तहसिलदार अजितसिंह पाटील यांनी नागरीकांना केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"माझे कुटुंब माझी जबाबदारी" या योजनेअंतर्गत शिंदेवाडी आणि वेळू गावातील सर्व नागरीकांची बुधवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी नागरीकांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

गेल्या काही दिवसात भोर तालुक्यातील वेळू आणि शिंदेवाडी या गावात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या योजनेअंतर्गत या दोन्ही गावातील नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वेळू आणि शिंदेवाडी या दोन्ही गावात मिळून सुमारे दोन हजार कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी सुमारे चाळीस तपासणी पथके नेमण्यात आली होती.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वेळू गावात तीन तर शिंदेवाडी येथे दोन ठिकाणी फ्ल्यू क्लिनिक उभारण्यात आले होते. आरोग्य तपासणीमध्ये कोरोनाची संशयास्पद लक्षणे आढळलेल्या व्यक्तीची फ्लू क्लिनिकमध्ये फेरतपासणी करून त्याची कोरोना चाचणी करण्यात येत होती. गावातील सर्व नागरीकांची आरोग्य तपासणी होईल, यासाठी नागरीक विना तपासणी बाहेर पडणार नाही, यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भोरचे तहसिलदार अजित पाटील यांनी स्वतः येऊन वेळू आणि शिंदेवाडी गावात या आरोग्य तपासणी कार्याचा आढावा घेतला. तसेच नागरीकांना कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटील म्हणाले, "आपली आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी कोणतेही आजार लपवून ठेवू नका. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही योजना प्रभावी ठरत आहे."

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: check the health of everyone says ajit singh patil