esakal | भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाबाबत ताजे अपडेट पाहा
sakal

बोलून बातमी शोधा

bha.jpg

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित प्रश्नांसाठी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे.

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाबाबत ताजे अपडेट पाहा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आंबेठाण : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित प्रश्नांसाठी सुरू केलेले उपोषण दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे. सुरू असणाऱ्या संततधार पावसाची तमा न बाळगता संपूर्ण रात्र आंदोलकांनी जागून काढली. बळीराजाला रस्त्यावर आणून शासन आणि राज्यकर्ते काय साध्य करू पाहत आहेत?असा सवाल आंदोलनकर्ते विचारत आहे.

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

कालपासून उपोषणावर ठाम असलेल्या आंदोलकांची तपासणी करण्यासाठी आज आरोग्य केंद्राचे कर्मचारी आले असता उपोषणकर्त्यांनी त्यास ठाम नकार दिला. तसेच आज दुपारी बाराच्या दरम्यान वहागाव येथे सखुबाई रामचंद्र चांभारे ही वृद्ध महिला शासनच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी पाण्यात उतरली होती. न्याय मिळत नाही असे म्हणत म्हणत ही महिला पाण्यात गेली परंतु खोल पाण्यात जात असल्याचे पाहून नागरिकांनी तिला वेळीच पाण्याबाहेर काढल्याने पुढील दुर्घटना टळली. 

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

न्यायालयाने निकाल देऊन प्रकल्पग्रस्तांना जमीन द्या असा आदेश दिला असताना प्रशासन कोणत्या अधिकाराने जमिनीऐवजी पैसे घ्या असे सांगत आहे असा सवाल उपस्थित करून हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप उपोषकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे काल सायंकाळपासून पाण्यात उतरून सुरू केलेले आंदोलन दुसऱ्या दिवशी सकाळी देखील सुरूच होते.आज बळीराजाची संपत्ती असणारी जनावरे घेऊन पाण्यात उतरणार असल्याचे विविध गावातील शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.तर आमच्यापैकी जे प्रकल्पग्रस्त कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. ते मुंबईत मंत्रालयासमोर उपोषण करणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्तांकडून दिली जात आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)
 

loading image
go to top