साध्या, सोप्या स्वादिष्ट व पौष्टिक खाऊची गंमत (व्हिडिओ)

साध्या, सोप्या स्वादिष्ट व पौष्टिक खाऊची गंमत (व्हिडिओ)

पुणे -  "आपला खाऊ आपणच तयार करणं यात मोठी मौज असते. उपलब्ध पदार्थंचा वापर करून  नाविन्यपूर्ण खाऊ तयार करताना कल्पकता पणाला लागते. सोलण, कापणं, मिसळणं वगैरे कृतींमधून वाढणारी कौशल्यं आयुष्यभर उपयोगी पडतात," असा कानमंत्र मुलांचे आवडते शेफ विष्णू मनोहर यांनी 'सकाळ' च्या बालवाचकांसाठी दिला आहे. 

ते म्हणाले," बनवलेला खाऊ आकर्षकपणे सजवून सादर करणं, तो खाल्ल्यावर मित्र आणि पालकांकडून दाद मिळणं हे अनुभवून तर पहा. आपण बनवलेल्या  खाऊचा मनसोक्त आनंद घेत उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवा. झगमगीत पॅकिंगमध्ये मिळणारा तयार खाऊ चवदार लागला तरी त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो का, याचा विचार मनात असू द्या. तूप, दही, गूळ, शेंगदाणे, काकडी, टोमॅटो, लिंबू, आंबा वगैरे सामग्रीपासून केवढ्या तरी पाककृती बनवता येतील. एखादा खेळ समजून नवीन पदार्थ झटपट कसा करता येईल, याचा विचार करा. त्यानुसार खाऊ बनवण्यातली धमाल अनुभवून पहा. "

चवदार पाण्याची भन्नाट कृती
विष्णूजींनी असंही सांगितलं की, उन्हाळ्यात खूप तहान लागते. भरपूर पाणी पिणं आवश्यक असतं. पाण्याच्या बाटलीत पुदिन्याची पानं, दालचिनीचा तुकडा, लिंबाची फोड घालून ठेवा. त्यामुळे साधं पाणीही वेगळ्या चवीचं होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com