‘चेक बाउन्स’चे खटले प्रलंबित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

आरोपीचा खटला लांबविण्याचा प्रयत्न  
खटला दाखल झालाच आहे, तर पैसे निकाल लागल्यावरच देऊ, अशी आरोपींची मानसिकता असते. त्यामुळे लवकर निकाल लागू नये, यासाठी तो प्रयत्नशील असतो. निकालानंतर तो वरच्या न्यायालयात जातो. त्यामुळे पुन्हा काही दिवस खटला चालतो. न्यायालयीन प्रक्रियेतील अडचणींमुळे देखील खटले प्रलंबित राहत असल्याची माहिती पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद पवार यांनी दिली.

पुणे - न्यायालयात खटला चालला तर दोघांनाही खर्च करावा लागेल. तसेच निकाल काय असेल व तो कधी लागेल याची खात्री नाही. त्यामुळे प्रकरण आपसांत मिटवू, असे आश्‍वासन धनादेश न वटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी तक्रारदाराला देतो. मात्र, ठरल्याप्रमाणे पैसे न दिल्याने व लांबलेल्या तारखांमुळे ही प्रकरणे अनेक वर्ष प्रलंबित राहत आहेत.

धनादेश न वटल्याच्या प्रकरणात वसुली नसते. तसेच व्यवहाराची सर्व माहिती बॅंकेच्या रेकॉर्डवर असते. त्यामुळे हा खटला त्वरित निकाली लागेल, अशी आशा तक्रारदाराला असते. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. नोटीस व समन्सला उत्तर न देणे, सुनावणीसाठी उशिराने मिळणाऱ्या तारखा, न्यायालयीन प्रक्रिया, निकालानंतर त्याविरोधात वरील न्यायालयात केलेले अपील, अशी कारणेदेखील ही प्रकरणे प्रलंबित राहण्यास कारणीभूत आहेत.

Web Title: Cheque Bounce Cases Panding Court