जिंदगी में जो करों अपनी औकात से ज्यादा करो : चेतन भगत

CHETAN-BHAGAT.jpg
CHETAN-BHAGAT.jpg

पिंपरी : ''मोबाइल आवश्यक असला, तरी त्यामुळे होणारे 'डिस्ट्रॅक्शन' हा तुमच्या यशातील सर्वात मोठा अडसर असे सांगत अपयशाला घाबरू नका, तो यशाच्या प्रवासातील टप्पा आहे. त्याचा सामना करा, असा सल्ला प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी दिला.

सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना ऐकण्यासाठी सकाळी दहा वाजेपासून तरुणांनी रांगा लावल्या होत्या. साडेअकराच्या सुमारास चेतन भगत यांची एंट्री झाली. त्यावेळी तरुणाईने टाळ्यांचा गजर करीत जल्लोष केला. नंतर भगत यांनी सर्वांना मोबाईलच्या फ्लॅश लावायला सांगितला आणि जय महाराष्ट्रचा घोष करायला सांगुन त्यांनी त्याचा विडियो लगेच केला इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

All set to motivate students in Pune today! No better way to spend a Sunday!!

A post shared by Chetan Bhagat (@chetanbhagat) on


चेतन भगत यांनी आपल्या आयुष्यातील काही घटना व अनुभवांच्या आधारे तरुणांशी संवाद साधण्यास प्रारंभत्यांनी सुरुवातीलाच प्रेक्षकांना बोलायची संधी देऊन संवाद खुला केला.ते म्हणाले, "कर्म करा, फळाची अपेक्षा ठेऊ नका. प्रत्येकासाठी यशाची व्याख्या वेगळी असते आणि ती वेगळीच असावी, असे सांगत त्यांनी "जिंदगी में जो करों अपनी औकात से ज्यादा करो" वर चर्चा रंगवली. अपयश तुम्हाला खूप काही शिकवते. त्याचाही आस्वाद घ्या, टेन्शन घेऊ नका, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर तरुणांच्या मनातील प्रश्नांना नर्म विनोदी शैलीत उत्तरे दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com